भारतीय अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) गुरुवार सकाळी (27 जानेवारी) सायबर हॅकिंगचा बळी ठरला आणि हॅकरने क्रुणालचे ट्विटर अकाउंट हॅक करून बिटकॉइन्ससाठी (Bitcoins) विकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले व यूजर्सना क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) पाठवण्यास सांगितले. हॅकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही अश्लील टिप्पण्या देखील पोस्ट केल्या. सकाळी 7:31 वाजता हॅकरने क्रिकेटपटूच्या खात्यातून एक ट्विट रिट्विट केले. आणि 2 मिनिटांनंतर, त्याने एका यूजरचे आभार मानले. हॅकरने त्याच्या अकाउंटवरून आतापर्यंत जवळपास 10 ट्विट केले आहेत. याबाबत कृणाल पांड्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गेल्या अर्ध्या तासात हॅकरकडून सतत पोस्ट टाकल्या जात आहेत. कृणाल सध्याच्या भारतीय संघातून बाहेर असून आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने त्याचा यंदाच्या रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये समावेश केला नाही.
गेल्या काही वर्षांत अनेक क्रिकेटपटूंची खाती हॅक झाली आहेत. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट देखील हॅक झाले होते. संशयास्पद क्रियाकलापांची तक्रार झाल्यानंतर खातेधारकाला सहसा त्याच्या/तिच्या प्रोफाईलमध्ये प्रवेश मिळतो आणि क्रिकेटपटूला त्याच्या खात्यातील क्रियाकलापांबद्दल अलर्ट मिळाल्यावर ट्विट डिलीट केले जाणे अपेक्षित आहे. कृणालच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळलेल्या कृणाल पांड्याला संघाने नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या रिटेन्शन लिस्टमध्ये ठेवले नव्हते. त्याचा भाऊ हार्दिक पांड्याचेही नाव त्या यादीत नव्हते. हार्दिक पांड्याला त्यानंतर अहमदाबाद संघाने 15 कोटी रुपयांमध्ये कर्णधार म्हणून त्याचा समावेश केला.
What the hell Krunal Pandya
Hacked#krunalpandya pic.twitter.com/K3JskoUY68
— Dua Lipa 🌶️ (@Dualipa589) January 27, 2022
फ्रँचायझीने 30 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला 2016 मध्ये ताफ्यात समावेश केला होता आणि 2018 मध्ये 8.8 कोटींची विक्रमी रक्कम देऊन त्याला कायम ठेवले होते. तसेच आयपीएल 2021 मधील त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे फ्रँचायझीने त्याला रिलीज केले. तीन वेळा आयपीएल विजेत्या खेळाडूने टी-20 लीगमध्ये 84 सामन्यांत 1143 धावा आणि 51 विकेट्स घेतल्या आहेत. एक कॅप्ड खेळाडू क्रुणालने लिलावासाठी आपली मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे.