India Women's Cricket Team: भारत महिला संघ (India Women's Team) यंदा वर्षाखेरीस इंग्लंडविरुद्ध (England) एक-कसोटी सामना खेळणार असल्याची आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी जाहीर केले. तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतीय महिला संघ सफेद जर्सी परिधान करेल. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 2014 नंतर महिला टीम इंडियाचा (Team India) पहिला प्रदीर्घ सामना ठरेल. यापूर्वी भारत आणि इंग्लंडने 2014 मध्ये एकदिवसीय कसोटी सामना खेळला गेला असून मिताली राज-नेतृत्वातील संघाने सहा विकेट्सने विजय मिळवला होता. “आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने टीम इंडिया @BCCIWomen या वर्षाच्या शेवटी @ECB_cricket विरुद्ध एक-कसोटी सामना खेळणार असल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. वूमन इन ब्लू पुन्हा व्हाइट्स परिधान करेल,” जय शाह यांनी ट्विट केले.
दरम्यान, भारत महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका संघात सध्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. कोविड-19 च्या प्रसारामुळे तब्बल वर्षभराच्या विश्रांतीनंतर भारतीय महिला संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लखनौ येथे पाच सामन्यांची एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात लिझेल ली आणि लौरा वोल्वार्डने आपापल्या अर्धशतकांच्या जोरावर संघाला यजमान महिला संघावर आठ विकेट्सने विजय मिळवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. कर्णधार मिताली राजच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर यजमान संघाने 9 विकेट गमावून 177 धावनापर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात, 178 डव्हाणच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ली आणि वोल्वार्डने नियमित चौकारांसह संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी भारतीय गोलंदाजांवर दबदबा ठेला. ली आणि वोल्वार्ड भारतीय गोलंदाजांवर वरचढ ठरत संघाला 26व्या ओव्हरयामध्ये 100 धावांचा टप्पा गाठून दिला.
On the occasion of #InternationalWomensDay, I’m pleased to announce that #TeamIndia @BCCIWomen will play a one-off Test match against @ECB_cricket later this year. The women in blue will be donning the whites again 🙏🏻 🇮🇳
— Jay Shah (@JayShah) March 8, 2021
दोघींनी संघर्षाची कोणतीही चिन्हे दर्शविली नाहीत आणि दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या जवळ नेत स्कोअरबोर्डवर धावांची भर घातली. 38व्या ओव्हरमध्ये झुलन गोस्वामीने वूलवार्डला 80 धावांवर बाद करत भारताला पहिला विजय मिळवून दिला. त्यानंतर, सुने लुस फलंदाजीला उतरली परंतु गोस्वामीने तिलाही स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. तथापि, महिला टीम इंडियाने सामन्यात उशीरा पुनरागम केली आणि दक्षिण आफ्रिकेने 41व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने सहज विजय मिळवला.