India Women's National Cricket Team vs West Indies Women's Cricket Team: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ, तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे खेळवला जाईल मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे राहू शकला नाही, जिथे त्यांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला. T20I मध्ये भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाला अनेकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यातील सामना नेहमीच रोमांचक असतो. दरम्यान या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - IND-W vs WI-W 1st T20I 2024 Mini Battle: 'हे' खेळाडू भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 मालिकेतील पहिला सामन्यात ठरू शकतात त्रासदायक)
भारतीय संघ मजबूत फलंदाजी क्रम आणि अनुभवी गोलंदाजांसह संतुलित दिसत आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा संघ आपल्या आक्रमक खेळाचा आणि अनुभवाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमधील हा सामना रोमांचक आणि जवळचा होण्याची शक्यता आहे.
पाहा पोस्ट -
India Women vs West Indies Women Live Score Updates of 1st T20I 2024: Get Toss Winner Result, Live Commentary and Full Scorecard Online of IND-W vs WI-W Cricket Match#INDWvWIW | #INDvWI | #India | #WestIndies https://t.co/kGwsES7Puj
— LatestLY (@latestly) December 15, 2024
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इेलेव्हन
टीम इंडिया : स्मृती मानधना, उमा छेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), सजीवन सजना, दीप्ती शर्मा, राधा यादव, सायमा ठाकोर, तितस साधू, रेणुका ठाकूर सिंग.
वेस्ट इंडिज: हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, शाबिका गझनबी, आफी फ्लेचर, जैदा जेम्स, मँडी मंगरू, करिश्मा रामहरक, शमिलिया कोनेल.