IND W vs NZ W (Photo Credit - X)

India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team: महिला टी-20 विश्वचषक 2024 ला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. आज भारत आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांसमोर (India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team) उभे ठाकणार आहेत. टीम इंडियाचा हा स्पर्धेतील पहिला सामना असेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. या दोघांमधील हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना असेल. टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही हा स्पर्धेतील पहिला सामना असेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल.

कुठे अन् किती वाजता खेळवला जाणार सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील महिला टी-20 विश्वचषक 2024 सामना शुक्रवार, 04 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. दोघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय चाहत्यांना संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सामना थेट पाहता येणार आहे.

कुठे पाहणार लाइव्ह सामना?

भारत आणि न्यूझीलंड महिला संघांमधील सामना स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. हॉटस्टारवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. (हे देखील वाचा: IND-W vs NZ-W, 2024 ICC Women's T20 World Cup Preview: महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांचा सामना आज न्यूझीलंडशी होणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारी)

महिला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ

शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, दयालन हेमलता, एस सज्जना, एस. शोभना.

महिला टी-20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ

सुझी बेट्स, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), हन्ना रो, रोझमेरी मायर, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, लेह कॅस्परेक, जेस केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर .