भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (Board of Control for Cricket in India) अर्थातच बीसीसीआय (BCCI) ने बुधवारी (19 मे 2021) महिला क्रिकेट संघासाठी (India Women Cricket Teams) वार्षीक करार केल्याची घोषणा केली. या करारात 'अ', 'ब' आणि 'क' तीन श्रेणींचा समावेश आहे. या वेळी भारतीय महिला क्रिकेट संघात युवा गोलंदाज शेफाली वर्मा (Shafali Verma) हिला बढती देत 'ब' श्रेणीत समाविष्ठ करण्यात आले आहे. तर हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur), स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांना 'अ' श्रेणीत ठेवण्यात आले आहे. हा करार ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 इतक्या कालावधीसाठी असणार आहे. दरम्यान, या वेळी करार करणाऱ्या खेळाडुंची संख्या 22 वरुन कमी करुन ती 19 करण्यात आली आहे. आपल्या आई आणि बहिणीला गमावलेल्या वेदा कृष्णमूर्ती हिला बीसीसीआयच्या नव्या यादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त होते आहे.
श्रेणी 'अ' मध्ये समावेश असणाऱ्या खेळाडूंना वारषिक 50 लाख रुपये मिळणार आहेत. या श्रेणीमध्ये तीन फॉर्मेट खेळणाऱ्या खेळाडू महिला टी-20 च्या कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृति मंधाना आणि लेग स्पिनर पूनम यादव यांचा समावेश आहे. 'ब' श्रेणीमध्ये समावेश असलेल्या खेळाडूंना वार्षिक 30 लाख रुपये मिळणार आहेत. या श्रेणीत मिताली राज, झूलन गोस्वामी आणि दीप्ति शर्मा यांच्यासह 10 खेळाडूंचा समावेश आहे. (हेही वाचा, ICC Women’s Cricket World Cup 2022 Schedule: महिला क्रिकेट विश्वकप वेळापत्रक जाहीर; भारतीय संघाचा पहिला सामना पहा कधी?)
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले की, शेफाली हिला पुढील वर्षीसाठी सर्वात मोठ्या खेळाडूच्या रुपात पाहिले जात आहे. त्यामुळे यात काहीच आश्चर्य नाही की तिचा समावेश 'क' श्रेणीतून 'ब' श्रेणीत झाला आहे. पूनम राऊत हिला दक्षिण अफ्रीका मालिकेत चांगली कामगिरी केल्याबद्दल बक्षिस मिळाले आहे. तिलाही 'ब' श्रेणीत समाविष्ठ करण्यात आले आहे. युवा खेळाडू ऋचा घोष हिला 'क' श्रेणीत जागा मिळाली आहे.
श्रेणी आणि खेळाडूचे नाव
- श्रेणी अ- हरमनप्रीत कौर, एस. मंधाना, पूनम यादव.
- श्रेणी ब- मिताली राज, झूलन गोस्वामी, दीप्ति शर्मा, पूनम राउत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तान्या भाटिया, जेमिमा रोड्रिग्ज
- श्रेणी क- मानसी जोशी, अरुंधति रेड्डी, पूजा वस्त्रकार, हरलीन देओल, प्रिया पुनिया और ऋषा घोष.
'क' श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 10 लाख रुपये मिळणार आहेत. 'क' श्रेणीमध्ये एकूण सहा खेळाडूंचा समावेश आहे. गेल्या वर्षिच्या तुलनेत यंदा ही संख्या पाचने कमी आहे.