भारतीय महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Twitter/ICC)

इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलकडून आज ( 15 डिसेंबर) 2022 Women's World Cup चं वेळापत्रक जारी केलं आहे. हे सामने न्यूझिलंडमध्ये होणार आहेत. 31 दिवस 31 सामने खेळले जाणार असून 4 मार्च 2022 ते 3 एप्रिल 2022 मध्ये हे सामने होणार आहेत. हे सामने न्यूझिलंडमध्ये Auckland, Tauranga, Hamilton, Wellington, Christchurch, आणि Dunedin या 6 शहरांमध्ये हे सामने होणार आहेत. भारतीय महिला संघाचा पहिला सामना 6 मार्चला होणार आहे. पण तो नेमका कोणाशी असेल याची माहिती क्वालिफायर नंतर समजणार आहे. सध्या भारत प्रमाणेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्युझिलंड, दक्षिण आफ्रिका या टीम विश्वचषकासाठी क्वालिफाय झाल्या आहेत. अन्य 3 टीम्सचा निर्णय श्रीलंका मध्ये पुढील वर्षी जून-जुलै मध्ये होनार्‍या क्वालिफाईंग टूर्नामेंटमध्ये होईल.

महिला क्रिकेट विश्वचषक 2022 वेळापत्रक

महिला क्रिकेट विश्वकपाचा हा 11 वा कार्यक्रम आहे. 1973 साली पहिल्यांदा इंग्लंडने यजमानपद स्वीकारत टूर्नामेंट जिंकली होती. तेव्हा इंग्लंडची महिला टीम 4 वेळेस विजेतेपदावर आपली मोहोर उठवू शकली आहे. तर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 6 वेळा विजेतेपद मिळवले आहे. न्युझिलंड एकदा जिंकली आहे. तर दोन वेळा फायनलमध्ये धडक मारलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला या अगामी विश्वचषकामध्ये विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न असेल.