भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट(Photo Credit: X/@BCCIWomen)

India Women National Cricket Team vs West Indies Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup Warm-up Matches 2024, 4th Match Scorecard:   ICC महिला T20 विश्वचषक (ICC Women's T20 World Cup 2024) 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. महिला टी-20 विश्वचषक सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केला जात आहे. यावर्षी ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेचा हा नववा हंगाम 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दुबई आणि शारजाह येथे खेळवला जाईल. दरम्यान, या स्पर्धेचे सराव सामने 28 सप्टेंबरपासून खेळवले जात आहेत. सरावाचा चौथा सामना भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 20 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच विजयाची चव चाखली आहे.  (हेही वाचा -  Australia Beat England 5th ODI Match: पाचव्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर DLS Method ने 49 धावांनी विजय; मालिका 3-2 ने केली नावावर)

या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 23 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि यास्तिका भाटिया यांनी मिळून डाव सांभाळला. टीम इंडियाने 20 षटकांत 8 विकेट गमावून 141 धावा केल्या. टीम इंडियासाठी जेमिमाह रॉड्रिग्सने नाबाद 52 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. जेमिमाह रॉड्रिग्जशिवाय यास्तिका भाटियाने 24 धावा केल्या.

पाहा पोस्ट -

वेस्ट इंडिजकडून कर्णधार हेली मॅथ्यूजने शानदार गोलंदाजी करत चार बळी घेतले. कर्णधार हेली मॅथ्यूजशिवाय चिनेल हेन्री आणि अश्मिनी मुनिसार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला 20 षटकात 142 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 13 धावांत तीन गडी गमावले. यानंतर शमीन कॅम्पबेल आणि चिनेल हेन्री यांनी मिळून डाव सांभाळला, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.

वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 121 धावा करू शकला. वेस्ट इंडिजकडून चिनेल हेन्रीने सर्वाधिक नाबाद 59 धावांची खेळी खेळली. चिनेल हेन्रीशिवाय अफी फ्लेचरने 21 धावा केल्या. टीम इंडियाच्या वतीने पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी घातक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. पूजा वस्त्राकरने सर्वाधिक तीन बळी घेतले. पूजा वस्त्राकरशिवाय दीप्ती शर्माने दोन बळी घेतले.