भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. या दोघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. पहिला सामना एकतर्फी झाला आणि यामध्ये भारतीय संघाने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही ताकद दाखवली. जर संघाने हा सामना जिंकला तर ते मालिकेवर कब्जा करतील. त्याचवेळी वेस्ट इंडिज मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
कोण कोणावर भारी?
यजमान वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आणि भारत यांच्यात आतापर्यंत एकूण 43 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 20 जिंकले आहेत आणि 20 गमावले आहेत. शेवटच्या वेळी जुलै 2023 मध्ये, भारताने क्वीन्स पार्क ओव्हल येथे यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय सामना खेळला होता. ज्यामध्ये टीम इंडियाचा विजय झाला.
कधी आणि कुठे पाहणार सामना?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका डीडी स्पोर्ट्सवर टीव्हीवर पाहता येईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. तसेच हा सामना तुम्ही मोबाईलवर जिओ सिनेमावर फ्रि मध्ये पाहता येईल. (हे देखील वाचा: T20 World Cup: T20 विश्वचषक जून 2024 मध्ये 27 दिवस चालणार, वेस्ट इंडिज आणि यूएसमध्ये होणार सामने)
पहा दोन्ही संघाचे खेळाडू
भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज एकदिवसीय संघ: शाई होप (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), अलिक अथानाज, यानिक कॅरिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जॅडन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशाने थॉमस.