Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st Test Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 49 षटकांत तीन गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. दरम्यान, चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात भारताने 10 विकेट गमावून 462 धावा केल्या आहे. यासह बंगळूर कसोटी जिंकायला भारताने न्यूझीलंडसमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
1ST Test. WICKET! 99.3: Mohammed Siraj 0(2) ct Tim Southee b Matt Henry, India 462 all out https://t.co/8qhNBrs1td #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 19, 2024
सरफराज खानने झळकावले शतक
भारताकडून सरफराज खानने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. सरफराजने 195 चेंडूत 150 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऋषभ पंत 99 धावा करून बाद झाला. राहुलला 16 चेंडूत केवळ 12 धावा करता आल्या. रवींद्र जडेजाला 15 चेंडूत केवळ पाच धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि विल्यम ओरोरके यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.
न्यूझीलंडने घेतली होती 356 धावांची मोठी आघाडी
त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना भारत पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाला. ही भारताची कसोटी डावातील सर्वात कमी धावसंख्या आहे. त्यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंड तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात दहा विकेट गमावून 402 धावांवर बाद झाला. यासह न्यूझीलंडने 356 धावांची मोठी आघाडी घेतली होती.