IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ODI मालिकेसाठी शुभमन गिल, अजिंक्य रहाणे यांना संघातून वगळल्याने सौरव गांगुली निराश; निवड समितीला दिला हा सल्ला
File Image of Sourav Ganguly (Photo Credits: Twitter @SGanguly99)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ (Indian Team) 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत-वेस्ट इंडिज संघात तीन टी-20, तीन वनडे आणि दोन टेस्ट सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर वनडे मालिका 8 ऑगस्ट तर टेस्ट मालिका 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी भारतातील युवा खेळाडू- नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि राहुल चाहर (Rahul Chahar) यांना संघात स्थान मिळाले आहे. मात्र टीम इंडिया 'ए' संघातील खेळाडूला वगळल्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) नाराज आहे. (ICC Test Ranking: आईसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली याचे अव्वल स्थान कायम तर Team India नंबर वन)

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रविवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. यासाठी युवा खेळाडूंसह टेस्ट मालिकासाठी अजिंक्य राहाणे (Ajinkya Rahane) याची फक्त टेस्ट मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तर युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याला डच्चू देण्यात आला आहे. आणि यावर 'दादा' सौरव गांगुली निराश झाला. गांगुलीने ट्विटरवर आपली निराशा व्यक्त करत लिहिले की,"संघात बरेच खेळाडू आहेत जे सर्व फॉर्मेट खेळू शकतात .. शुभमान गिल... अजिंक्य रहाणेला वनडे संघात नसणे हे आश्चर्यकारक आहे."

गांगुली हे देखील म्हणाला की, आता वेळ आली आहे जेव्हा निवड समितीने खेळाच्या सर्व तीन फॉर्मेटसाठी एकाच खेळाडूची निवड करावी. यामुळे खेळाडूंचे आत्मविश्वास आणि लय वाढविण्यात मदत होईल.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी गिलची निवड न झाल्याने अनेक जणांनी निराशा व्यक्त केली आहे. टीम इंडिया 'ए' आणि वेस्ट इंडिज 'ए' यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेत गिलला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. टीम इंडिया 'ए' कडून गिलने जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत 38 सामन्यात 45.44च्या सरासरीने 1545 धावा केल्या आहेत.