भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील पहिला वनडे सामने पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर दोन्ही संघ आता दुसऱ्या वनडेमध्ये आमने-सामने असतील. भारत-वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या वनडे सामना क्वीन्स पार्क ओव्हल मैदानात खेळाला जाईल. 3 सामन्याच्या वनडे मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी दुसरा वनडे सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा करणार आहे. मागील वनडे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता, त्यामुळे उर्वरित दोन्ही सामने जिंकणे महत्वाचे असणार आहे. भारताने याआधी टी-20 मालिके 3-0 ने जिंकली. (विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कथित मतभेदावर सुनील गावस्कर यांनी सोडले मौन, केल हे महत्वपूर्ण विधान)
भारत आणि वेस्ट इंडिजचा दुसरा वनडे सामना तुम्ही ऑनलाइन Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HDआणि SonyLiv Online वर पाहु शकता.
विश्वचषकमधील पराभवानंतर दोन्ही संघासाठी पहिला द्विपक्षीय मालिका आहे. मागील वनडे सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना काही खास करता आले नाही. भारत आणि विंडीजमधील वनडे मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंना विक्रमी खेळी करण्याची संधी आहे. विंडीजचा धडाकेबाज ख्रिस गेल (Chris Gayle) याला ब्रायन लारा (Brian Lara) याचा रेकॉर्ड मोडत विंडीजसाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना देखील दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड मोडण्याची किंवा त्यांची बरोबरी करण्याची संधी आहे. रोहित आपल्या एका शतकासह डेविड वॉर्नर (David Warner) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची बरोबरी करू शकतो.
वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक शतकं करण्याचा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. दुसरीकडे, वॉर्नरने 2016 आणि गांगुलीने 2000 मध्ये 7 शतकं केली होती. रोहितने यंदाच्या वर्षी 6 शतकं केली आहे. विंडीजविरुद्ध रोहितने एक शतक लगावलं तर तो वॉर्नर आणि गांगुलीची बरोबरी करु शकतो.