भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात 15 सप्टेंबरपासून 3 सामन्यांची टी-20 आणि टेस्ट मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिकामधील पहिला टी-20 सामना धर्मशाळामध्ये खेळाला जाईल. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची मानली जात आहे. आतापर्यंत टी-20 मालिकेत दोन्ही संघ 14 वेळा एकमेकांविरूद्ध आले आहेत. त्यापैकी भारताने आठ आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाच सामने जिंकले आहेत तर एका सामना अनिर्णित राहिला. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वँडरर्स (Wanderers) स्टेडियमवर झालेल्या टी-20 सामन्यात दोन्ही संघामध्ये पहिल्यांदा लढत झाली होती. (IND vs SA T20I: 15 सप्टेंबरपासून होणार भारत-दक्षिण आफ्रिका संघात लढत, कोण कोणाच्या वरचढ, पहा हे आकडे)
एकमेकांविरुद्ध खेळलेल्या आजवरच्या मालिकेत अनेक प्रसंग असे आहेत जे ज्याच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. आणि त्यातील एक म्हणजे 27 वर्ष पूर्वी झालेला मंकडचा प्रसंग. काही वर्षांपूर्वी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपील देव (Kapil Dev) यांनी मंकड पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू पीटर कर्स्टन (Peter Kirsten) यांना बाद केले होते. रंगभेद युगानंतर दक्षिण आफ्रिकाने 1992 मध्ये भारत दौर्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. देव यांनी 'मंकड' च्या प्रसिद्ध पद्धतीने कर्स्टनला धाव बाद केले. आणि यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील इंद्रधनुष्य 'मैत्री मालिकेला वेगळेच वळण दिले. डिसेंबर 1992 साली पोर्ट एलिजाबेथमधल्या दुसऱ्या वनडेदरम्यान देवने कर्स्टनला अशाप्रकारे आऊट केलं होतं. पण, असे करण्याआधी देव यांनी कर्स्टनला ताकीदही दिली होती, तरीही ती न जुमानता कर्स्टनने बॉल टाकायच्या आधीच क्रिज सोडल्यामुळे कपील यांनी मंकडिंग करून त्याला आऊट केलं. यामुळे नाराज झालेला आफ्रिकेचा कर्णधार केपलर वेसल्स (Kepler Wessels) याने पुढील षटकात धाव घेताना अशा प्रकारे बॅट भिरकावली, जी थेट कपिलच्या पायाच्या हाडावर आदळळी. मात्र, त्यावेळी मॅच रेफ्री नसल्यामुळे वेसल्सला कोणतीही शिक्षा झाली नाही.
मॅच फिक्सिंगपासून सचिन तेंडुलकर याच्यावर बॉल-टॅम्परिंग प्रकरणात बंदी घालण्यापर्यत मागील अनेक वर्षांत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेमधून अनेक मोठे वाद निर्माण झाले आहेत. पण, सध्या भारताच्या दौऱ्यावर येणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाची व्यथा काहीशी वेगळी आहे. विश्वचषकमधील लाजिरवाण्या पराभवानंतर संघ पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष्य त्यांच्यावर असणार आहे. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याला कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.