आगामी टी -20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे आयोजन हे अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये करण्यात आले आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे. स्पर्धेतील पहिला सामना 1 जूनला रंगणार असून फायनलचा सामना 29 जून रोजी रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्याच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. ( IND vs ENG Dharamsala Test: इंग्लंडविरोधात अखेरच्या कसोटीत बुमराह करणार पुनरागमन)
येत्या 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना रंगणार आहे. ज्यावेळी या सामन्याच्या तिकिटांची घोषणा करण्यात आली त्यावेळी तिकिटांची किंमत केवळ 500 रुपये इतकी होती. मात्र आता या तिकिटांची किंमत गगनाला भिडताना दिसून येत आहे. या सामन्याच्या VIP तिकिटांची किंमत 400 डॉलर म्हणजे 33 हजारांच्या घरात आहे. तर इतर वेब साईटवर या तिकिटांती किंमत 40 हजार डॉलर म्हणजे 33 लाख रुपये इतकी आहे.
या साईटवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांच्या तिकिटांची किंमत लाखात आहे. जसजशी ही स्पर्धा जवळ येत आहे तशी तिकिटांची किंमतही वाढत चालली आहे. सध्या या वेबसाईटवर तिकिटांची किंमत ही 179.5 हजार डॉलर इतकी आहे. यासह तुम्हाला कर देखील द्यावा लागेल. म्हणजे आता तुम्हाला ही तिकिटं 50-60 लाख रुपये इतकी आहे.