IND vs ENG Dharamsala Test: इंग्लंडविरोधात अखेरच्या कसोटीत बुमराह करणार पुनरागमन
Photo Credit - X

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका (IND vs ENG) आता अखेरच्या टप्प्यात आहे. भारतीय संघाने (Team India) चौथ्या कसोटी सामन्यात (India vs England Test ) विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. आता अखेरचा कसोटी सामना सात मार्चपासून धर्मशाला मैदानात रंगणार आहे. या कसोटी सामन्यात भारताच्या प्लेईंग 11 मध्ये बदल निश्चित मानला जातोय. चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला होता. आता तो कमबॅकसाठी तयार झालाय.  (हेही वाचा - Yashasvi Jaiswal, ICC Test Ranking: यशस्वीची ICC Ranking मध्ये हनुमान उडी, रोहित शर्मालाही टाकले मागे)

रांची कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला होता. पण अखेरच्या कसोटी सामन्यासाठी आता बुमराह उपलब्ध असेल.  धर्मशाला येथे रंगणाऱ्या कसोटी सामन्यात सिराज आणि बुमराह वेगवान गोलंदाजीची धुरा संभाळू शकतात. आकाशदीपला बेंचवरच बसवलं जाऊ शकतं.  रांची कसोटीत बुमराहला आराम दिल्यानंतर आकाशदीपचं पदार्पण झालं होतं.

लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ नव्या दमाने मैदानात उतरेल. अखेरचा सामना जिंकून इंग्लंडचा संघ शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल, याच शंकाच नाही. इंग्लंडच्या अतिआक्रमक बॅझबॉल भारतीय भूमीवर सपशेल अपयशी ठरला.