India-Pakistan Bilateral Series: भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका जागतिक क्रिकेटसाठी चांगली, पण भारत सरकारमुळे खेळली नाही; PCB अध्यक्ष एहसान मनीचे विधान
भारत विरुद्ध पाकिस्तान (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) देशातील द्विपक्षीय मालिका जागतिक क्रिकेटच्या आरोग्यासाठी चांगली असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष एहसान मनी (Ehsan Mani) यांनी म्हटले. मनी यांनी म्हटले की सिनिअर राष्ट्रीय संघांचे वेळापत्रक योजना आखताना पीसीबी भारतविरुद्ध द्विपक्षीय मालिका विचारात घेत नाही. भारत-पाकिस्तान सामन्याची सर्वाधिक चर्चा होते, पण भारत सरकारच्या धोरणामुळे दोन्ही देशांमध्ये सामने खेळले जात नाही. जानेवारी 2012 पासून भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय (India-Pakistan Bilateral Series) क्रिकेट खेळलेले नाही जेव्हा पाकिस्तान 2 टी-20 आणि 3 वनडे सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला होता. दुसरीकडे, 2007-08 हंगामापासून दोन्ही संघात द्विपक्षीय कसोटी मालिका खेळली गेली नाही. तथापि, भारत आणि पाकिस्तान आयसीसी आयोजित स्पर्धेत आमने-सामने येतात. अखेरीस दोन्ही टीम 2019 विश्वचषक सामन्यात आमने-सामने आले होते. पूर्वी द्विपक्षीय मालिका घेण्याच्या प्रयत्नांनी अनुकूलता दर्शविली नाही, परिणामी क्रिकेट प्रेमींना सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्यामधील मर्यादित सामने पाहण्यास मिळतात. (भारत-पाकिस्तान मालिकेत बॉल टेंपरिंगबाबत भारताचे माजी विकेटकीपर किरण मोरे यांनी केले धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर)

“पाकिस्तान-भारत सामने जगातील सर्वाधिक पाहिले जाणारे क्रिकेट सामने आहेत,” मनी यांनी Cricbuzzला सांगितले. “तथापि, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट कौन्सिल (एसीसी) स्पर्धांव्यतिरिक्त भारत सरकारच्या धोरणामुळे आम्ही एकमेकांविरूद्ध खेळत नाही. आम्ही एकमेकांविरूद्ध खेळत असलेल्या जागतिक क्रिकेटच्या आरोग्यासाठी हे चांगले आहे, तथापि, आमच्या नियोजनात आम्ही भारताविरूद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका विचारात घेत नाही."

मनी म्हणाले की क्रिकेट बोर्डाने अल्प मुदतीच्या आवड बाजूला ठेवावे आणि जागतिक खेळाच्या कल्याणासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. शोएब अख्तर आणि वकार युनूससह पाकिस्तानच्या काही क्रिकेटपटूंनी भारत-पाकिस्तानला द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्याचे आव्हान दिल्यानंतर मनी यांनी हे विधान केले. यापूर्वी अख्तरने कोविड-19 मदत निधी उभारण्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये 3 सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता पण, माजी भारतीय क्रिकेटपटूंनी वेगवान गोलंदाजांच्या या संकल्पनेला धुडकावून लावले.