(Photo by Jordan Mansfield/Getty Images)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये सुरु असलेल्या भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) यांचा सामना पावसामुळे थांबला आहे. न्यूझीलंडने 46.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 211 धावा केल्या आहेत. टॉस जिंकत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या या निर्णयावर भारतीय गोलंदाजांनी पाणी फेरले. भारत-न्यूझीलंड मधील सामना मँचेस्टर (Manchester) च्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर खेळाला जात आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने किवी सलामीवीर मार्टिन गुप्टिल (Martin Guptil) ला माघारी धाडले. न्यूझीलंडन या सामन्यात खुपच स्लो फलंदाजी करताना दिसले. 40 ओव्हरनंतर त्यांनी पहिल्यांदा रनरेटमध्ये 4चा आकडा गाठला. (IND vs NZ, World Cup 2019: मँचेस्टरमध्ये पावसाला सुरुवात, खेळ थांबला; टीम इंडियाला मिळू शकते इतक्या धावांचे आव्हान)

दरम्यान पावसाचा जोर वाढला आहे. याच वेळी किवी टीमचा सलामीवीर कॉलिन मुनरो (Colin Munro) स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना स्वाक्षरी देताना दिसला.

दुसरीकडे पावसाचा जोर वाढला आणि आज सामना रद्द होण्याची शक्यता आहे. आयसीसीकडून सेमीफायनल सामन्यांसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुले सामना दुसऱ्या दिवशी 46.1 ओव्हरपासून सुरु होईल. असाच प्रकार 1999मध्ये आणि 2002च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये घडला होता. दरम्यान, माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने न्यझीलंड विरुद्धच्या सेमीफायनल मॅचसाठी मैदानात उतरताच एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडविरुद्ध आजची मॅच ही धोनीच्या वनडे करिअरमधील 350वी मॅच आहे. टीम इंडियाकडून सर्वाधिक वनडे खेळणारा धोनी, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नंतर दुसराच खेळाडू आहे. सचिनने वनडेमध्ये सर्वाधिक 463 मॅच खेळल्या आहेत.