India Vs New Zealand 4th ODI: विराट कोहली सुट्टीवर गेल्याने भारतीय संघाची दांडी गुल - चाहत्यांमध्ये संताप
Indian Cricket Team (Photo Credit: IANS)

India Vs New Zealand 4th ODI: भारतीय (India) संघाचा न्युझिलंड (New Zealand) विरुद्धचा एकदिवसीय सामना गुरुवारी (31जानेवारी) हेमिल्टन येथे खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाल्याने सध्या नेटकऱ्यांमध्ये भारतीय संघाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. तसेच भारतीय संघाचा कॅप्टन कुल सध्या सुट्टीवर आहे. मात्र आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघाची दांडी गुल झालेली पाहायला मिळाली आहे.

भारतीय संघाने आजच्या सामन्यात फक्त 92 धावा काढून माघारी परतला. याविरुद्ध 1981 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामना सिडनीमध्ये खेळवला गेला. त्यावेळी भारतीय संघाने 63 धावा काढल्या. 1986 रोजी श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात 78 धावा आणि सियालकोट येथे 1978 रोजी भारतीय संघाने 79 धावा काढल्या होत्या. त्याचप्रमाणे न्युझिलंड विरुद्ध 2010 रोजी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने फक्त 88 धावा काढल्या होत्या. तर आज अत्यंत वाईट स्थितीने भारतीय संघाचा पराभव झाल्याने नेटकऱ्यांकडून संघावर टीका करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर संघाला ट्रोल करण्यात येत आहे. (हेही वाचा-India Vs New Zealand 4th ODI: न्युझीलंड विरुद्ध भारत चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव; 8 विकेट्सने केली मात)

पाच सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत भारताने पहिले तीन सामने जिंकले असून न्युझीलंडचा हा पहिलाच विजय आहे. सध्या विराट कोहलीला विश्रांती दिल्याने रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली न्युझीलंड मालिकेतील हा पहिलाच सामना होता.