Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 1 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सकाळी 9.30 वाजता होणार आहे. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा 113 धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंडने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. यासह न्यूझीलंड संघाने नवा इतिहास रचला आहे. न्यूझीलंड संघाने प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली आहे. टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा पराभव करून आपली इज्जत वाचवायची आहे. तर, न्यूझीलंडचा संघ क्लीन स्वीपच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
विराट कोहलीवर असेल सर्वाच्या नजरा
वानखेडे कसोटीत सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असणार आहेत. या मालिकेत आतापर्यंत विराट कोहलीची बॅट शांत राहिली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहली फलंदाजीसाठी उतरताच तो राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडेल. यानंतर विराट कोहलीच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकरचा विक्रम असेल. (हे देखील वाचा: World Test Championship 2023-2025 Final Scenario: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्या संघाला किती विजय आवश्यक आहेत? भारतासह प्रत्येक देशाची स्थिती घ्या जाणून)
विराट कोहली त्याची 600वी आंतरराष्ट्रीय इनिंग खेळण्यापासून फक्त एक पाऊल दूर
वास्तविक, टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 599 डाव खेळले आहेत. म्हणजेच 600 आंतरराष्ट्रीय डाव पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीला आणखी एका सामन्याची गरज आहे. 1 नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या कसोटीत विराट कोहली मैदानात उतरताच, अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. राहुल द्रविडनेही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ 599 डाव खेळले आहेत.
राहुल द्रविडने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय डाव खेळले आहेत
टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने एकूण 605 इनिंग्स खेळल्या आहेत. राहुल द्रविडने आशिया 11 साठीही काही सामने खेळले आहेत. त्यामुळे राहुल द्रविडच्या एकूण आंतरराष्ट्रीय डावांची संख्या 600 हून अधिक असली तरी तो भारतासाठी केवळ 599 डाव खेळण्यात यशस्वी ठरला आहे.
या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर
सचिन तेंडुलकर हा टीम इंडियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय डाव खेळणारा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने टीम इंडियासाठी 782 आंतरराष्ट्रीय डाव खेळले आहेत. या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.