वेलिंग्टनमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात यजमान न्यूझीलंड संघाला 348 धावांवर ऑलआऊट केल्यावर भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करत दिवसाखेर 4 विकेट गमावून 144 धाव केल्या. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघ अजून 39 धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट 3, टिम साऊथी ने 1 विकेट घेऊन भारताच्या अडचणीत वाढ करत राहिले. दिवसाखेर अजिंक्य रहाणे 25 आणि हनुमा विहारी नाबाद 11 धावा करून खेळत आहेत.
IND vs NZ 1st Test Day 3 Highlights: तिसर्या दिवशी भारताने दुसर्या डावात केल्या 144/4, न्यूझीलंडला 39 धावांची आघाडी
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पहिला कसोटी सामना महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचला आहे. सामन्याच्या दुसर्या दिवशी यजमान न्यूझीलंडने भारतावर पहिल्या डावात आघाडी घेतली आहे, पण टीम इंडियाच्या पुनरागमनच्या आशा अजूनही कायम आहेत. आता सामन्याच्या तिसर्या दिवशी म्हणजे रविवारी पहिले सत्र महत्त्वाचे ठरेल. जर भारतीय संघाने (Indian Team) या सत्रात चांगली कामगिरी बजावली तर सामन्यात त्यांच्या विजयाची शक्यता बनते. आणि रविवारी जर पहिल्या दोन तासांत न्यूझीलंडने चांगला खेळ केला तर त्यांची सामन्यावरील पकड आणखी घट्ट होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी पहिला कसोटी सामना सुरू झाला. हा सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे.
सामन्याच्या दुसर्या दिवशी 165 धावा करुन भारतीय संघ ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट गमावून 216 धावा केल्या. अशाप्रकारे, त्यांना भारतावर 51 धावांची आघाडी मिळाली आहे. त्यांच्याकडून कर्णधार केन विल्यमसनने 89 धावांची शानदार खेळी केली. भारताकडून अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक धावा केल्या. मयंक अग्रवालने 34 धावांचा डाव खेळला. या दोघांशिवाय अन्य कोणताही भारतीय 25 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. संघातील सहा फलंदाज दहाचा आकडाही स्पर्श करु शकले नाहीत. न्यूझीलंडकडून टीम साऊथी आणि काईल जैमीसनने प्रत्येकी 4-4 गडी बाद केले. ट्रेंट बोल्टला 1 विकेट मिळाली. रिषभ पंत रनआऊट झाला. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)