India vs New Zealand 1st T20I 2019: न्यूझिलंड विरुद्ध भारत एकदिवसीय सामना मालिका 4-1 अशा आघाडीने जिंकत भारतीय क्रिकेट संघाने न्युझिलंडमध्येही विजयी कामगिरी केली आहे. आता भारतीय क्रिकेट संघ टी20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे. आजपासून न्युझिलंडमध्ये टी20 सीरीजला सुरूवात होणार आहे. वेलिंग्टनच्या (Wellington) आजच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताने टॉस जिंकला आहे.
टॉस जिंकत भारताने वेलिंग्टनमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-20 सामन्यांमध्ये विराट कोहलीला आराम देण्यात आला असून भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मैदानात उतरणार आहे.
India vs New Zealand 1st T20i: India wins the toss and elects to bowl first in Wellington. #INDvsNZ pic.twitter.com/BNQxgrUID9
— ANI (@ANI) February 6, 2019
कसा असेल संघ?
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, कृणाल पंडय़ा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलिल अहमद.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डे ग्रँडहोम, लॉकी फग्र्युसन, स्कॉट कगलेनजिन, कॉलिन मुन्रो, डॅरेल मिचेल, मिचेल सान्तनेर, टिम सेईफर्ट, ईश सोधी, टिम साऊदी, रॉस टेलर, ब्लेयर टिकनर, जेम्स नीशाम.
भारताची न्यूझीलंड विरुद्धची टी20मधील कामगिरी अत्यंत वाईट आहे. आतापर्यंत भारताने न्यूझीलंड विरुद्ध 8 टी20 सामने खेळले आहेत. त्यातील फक्त दोनच सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे.