India Vs New Zealand 1st ODI: विजयानंतर विराट कोहलीने मैदानातच असा व्यक्त केला आनंद (Video)
Virat Kohli (Photo Credits: IANS)

India Vs New Zealand 1st ODI: भारताने न्युझीलँड दौऱ्याची यशस्वी सुरुवात केली. पहिला एकदिवसीय सामना जिंकल्याचा आनंद कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) हटके स्टाईने साजरा केला. सामना संपल्यानंतर विराट 'सेगवे' (Segway) दुचाकीवर उभा राहीला आणि त्यावरुन मैदानात मोकळेपणाने फिरु लागला. (मोहम्मद शमी ठरला एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज!)

आजपासून न्युझीलँडविरुद्ध सुरु झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 157 धावांत न्युझीलँडचा संपूर्ण संघ माघारी धाडला. त्यानंतर 8 गडी राखत भारताने न्युझीलँडवर विजय मिळवला. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.