
वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला (Team India) चार देशांविरुद्ध मालिका खेळायची आहे. या मालिकेत आयर्लंडच्या नावाचाही समावेश आहे. टीम इंडियाला आयर्लंड (Ireland) दौऱ्यावर 3 सामन्यांची टी-20 मालिका (T20 Series) खेळायची आहे. या दौऱ्यातील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने आधीच टीम इंडियाची घोषणा केली होती. स्पोर्ट्स 18 वर टीम इंडिया आणि आयर्लंड टी-20 मालिकेचा आनंद घेता येईल. या मालिकेचे हक्क Viacom 18 ने विकत घेतले आहेत. स्पोर्ट्स 18 वर टीम इंडियाची कोणतीही मालिका प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ असेल. याआधी, आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या कराराव्यतिरिक्त, वायाकॉमकडे कधीही टीम इंडियाच्या मालिकेचे अधिकार नव्हते. ही मालिका फॅन्स फॅनकोड आणि जिओ सिनेमावरही पाहता येईल.
Viacom 18 ने शुक्रवारी अधिकृतपणे या कराराची घोषणा केली. Viacom 18 नेटवर्क व्यतिरिक्त, जिओ सिनेमा आणि फॅनकोडला परवाना करारामुळे या मालिकेच्या लाइव्ह स्ट्रीमिंगचे अधिकार मिळाले आहेत. ही मालिका 18 ऑगस्टपासून डब्लिनमध्ये सुरू होत आहे, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे. (हे देखील वाचा: IND vs WI 4th T20I: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चोथा टी-20 सामना होणार फ्लोरिडामध्ये, येथे जाणून घ्या मैदानाची आकडेवारी)
टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या खालच्या भागात फ्रॅक्चर झाल्यामुळे एक वर्षासाठी संघाबाहेर आहे. अशा स्थितीत या मालिकेत जसप्रीत बुमराह आपल्या शानदार पुनरागमनाच्या आशेने मैदानात उतरेल. या मालिकेसाठी भारताने युवा संघाची निवड केली आहे. यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे.
आयर्लंडमधील डब्लिन येथे होणाऱ्या या मालिकेत टीम इंडिया तीन टी-20 सामने खेळणार आहे. ज्यामध्ये पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. दोन्ही संघ 20 ऑगस्टला दुसरा सामना खेळणार आहेत. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी-20 मालिकाचे वेळापत्रक:
- पहिला सामना: 18 ऑगस्ट, मालाहाइड (7:30 PM IST)
- दुसरा सामना: 20 ऑगस्ट, मालाहाइड (7:30 PM IST)
- तिसरा सामना: 23 ऑगस्ट, मालाहाइड (7:30 PM IST)
टी-20 मालिकेसाठी दोन्ही देशाचे संघ
टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्पर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वूरकोम, बेन व्हाइट, क्रेग यंग .