अरे बापरे..! हेल्मेट तोडून चेंडू खेळाडूच्या डोळ्यावर आदळला (व्हिडिओ)
(Photo Credits: twitter)

क्रिकेट हा तसा फारसा दुखापत न करणारा सुरक्षित खेळ. पण, तरीही क्रिकेटच्या मैदानार अनेक अपघाती प्रसंग पहायला मिळाले आहेत. इतके की, या अपघातांमध्ये काही खेळाडूंचे मैदानावर निधन झाले आहे. तर, काही प्रसंग खेळाडूंच्या जीवावर बेतले आहेत. ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात असाच एक प्रसंग खेळाडूच्या जीवावर बेतला. फलंदाजाने टोलावलेला एक वेगवान चेंडू थेट क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूच्या डोळ्यावर आपटला.

पहिल्या टेस्ट सामन्यादरम्यान हनुमा विहारी शॉर्ट लेकवर क्षेत्ररक्षण करत होता. दरम्यान, इंग्लंडचा अष्ठपैलू खेळाडू आणि डावखूरा फलंदाज बेन स्टोक्स स्ट्राईकवर होता. गोलंदाजीची जबाबदारी रविंद्र जडेजावर होती. त्याने चेंडू टाकला. उसळत्या चेंडूवर स्टोक्सने जोरदार फटका लगावला. चेंडू थेट हनुमा विहारीच्या हेल्मेटवर आदळला. पण, चेंडूचा वेग इतका की, तो थेट हनुमा विहारीच्या चेहऱ्यावर डोळा आणि डोळ्याच्या आजुबाजूला लागला. चेंडूचा मार लागताच हनुमा विहारी जागेवरच खाली कोसळला.

विहारीला चेंडूचा मार लागल्याचे ध्यानात येताच आजुबाजूचे खेळाडू आणि पॅव्हेलीनमधील डॉक्टर तातडीने विहारी जवळ आले. डॉक्टरांनी विहारीवर मैदानातच उपचार सुरु केले. त्याला बरे वाटू लागल्यावर सामना काही वेळातच पुन्हा सुरु झाला.