भारत (India) विरुद्ध बांग्लादेश (Bangladesh) विश्वकप सामन्यात 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) ने आपले स्पर्धेतील चौथे शतक ठोकले आहे. टीमसाठी महत्वाच्या सामन्यात रोहित 92 बॉलमध्ये 104 रन करून आऊट झाला. रोहितचं वनडे क्रिकेटमधलं हे 26वं शतक होतं. आतापर्यंत या विश्वकपमध्ये रोहितने दक्षिण आफ्रिका (South Africa), पाकिस्तान (Pakistan), इंग्लंड (England) आणि आता बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले आहे. याच बरोबर रोहितने आपल्या नावावर एक-दोन नाही तर 5 विक्रम नोंदवले आहेत. (IND vs BAN, ICC World Cup 2019: टीम इंडियाचे बांगलादेश ला 315 धावांचे आव्हान; रोहित शर्मा ची शतकी खेळी)
एका विश्वकपमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर जमा झाला आहे. याच बरोबर त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) ला मागे टाकलं. गांगुलीने 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये तीन शतकं केली होती. शिवाय एका विश्वकपमध्ये 4 शतकं झळकावणारा रोहित कुमार संगकारा (Kumar Sangakkara) नंतरचा दुसरा खेळाडू आहे. विश्वकपमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने वर्ल्ड कपमध्ये एकूण 6 शतकं केली होती. रोहितने विश्वकपमध्ये आत्तापर्यंत 5 शतके केली असून त्यातील 4 यंदा केली आहेत.
दरम्यान, रोहितने विश्वकपमध्ये 500 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने ऑस्ट्रेलिया (Australia) च्या डेविड वॉर्नर (David Warner) ला मागे टाकून 532 धावा केल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ वॉर्नर 516, अॅरॉन फिंच (Aaron Finch) ने 504 धावा केल्या आहेत. विश्वकपमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा भारतीय आहे. याआधी सचिनने 1996 आणि 2003 मध्ये ही कामगिरी केली होती.
बांगलादेशविरुद्धच्या शतकी खेळीत रोहितने 5 षटकार मारले. यासह तो भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने 230 षटकार मारले असून दुसऱ्या क्रमांकावर एम एस धोनी (MS Dhoni) आहे. सर्वाधिक षटकारांच्या यादीत शाहिद आफ्रिदी (351) पहिल्या, ख्रिस गेल (326) दुसर्या, तर माजी श्रीलंकन खेळाडू सनथ जयसुर्या (270) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आणि बांगलादेशविरुद्ध मॅचमध्ये रोहित शर्मा आणि के. एल राहुल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 176 धवनची भागीदारी झाली. विश्वकपमधली टीम इंडियासाठी ही सगळ्यात मोठी ओपनिंग पार्टनरशीप आहे.