(Photo by Henry Browne/Getty Image)

एजबस्टन (Edgbaston) येथील भारत (India) विरुद्ध बांग्लादेश (Bangladesh) सामन्यात पहिले फलंदाजी करत टीम इंडिया ने विजयासाठी बांग्लादेशसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. भारतीय संघाने 50 षट्कारात 9 बाद 314 धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताच्या सलामी जोडी,रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के. एल राहुल (KL Rahul), यांनी आक्रमक सुरुवात करत, निर्णय योग्य ठरवलं. रोहित-राहुल जोडीच्या जोरावर भारताने 18व्या ओव्हरमध्ये शंभरी गाठली. त्याचबरोबर राहुल आणि रोहित यांनी दुसऱ्यांदा विश्वकपमध्ये शतकी भागिदारी केली. (ICC World Cup 2019: IND vs BAN मॅचमध्ये टीम इंडियाच्या ब्लू जर्सीतल्या चांगल्या कामगिरी नंतर ऑरेंज जर्सी पुन्हा Netizens च्या निशाण्यावर)

रोहितने 28व्या ओव्हरमध्ये आपले विश्वकपमधील चौथे शतक साजरे केले तर राहुलने ही आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, शतक करताच रोहित बाद झाला. त्यामागे, राहुल ही 77 धावांवर बाद झाला. रिषभ पंत (Rishabh Pant)आणि विराटच्या जोडीमध्ये चांगली भागिदारी होत असतानाच विराट पहिल्यांदा अर्धशतक न करता बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भोपळा न फोडताच बाद झाला. तर त्यामागे, रिषभही अगदी मोक्याच्या क्षणी बाद झाला. दरम्यान, आपलं पहिला विश्वकप खेळत असलेला दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) 9 चेंडूत 8 धावा करत बाद झाला.  धोनी ने 33 चेंडूत 35 धावा करून भारताला 300 च्या पुढे नेले. बांग्लादेशसाठी वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान ने  59 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

एजबस्टन मधील सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. भारतीय संघ 7 सामन्यात 11गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचा संघ 13 गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचेल. दुसरीकडे बांगलादेशला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ही शेवटची संधी असेल.