इंग्लंड च्या एजबस्टन (Edgbaston) मैदानावर होणाऱ्या भारत (India) विरुद्ध बांग्लादेश (Bangladesh) सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी सेमीफाइनलच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पहिले फलंदाजी करत भारताची सलामी जोडी, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के एल राहुल (KL Rahul), ने दमदार सुरुवात करून दिली आहे. भारताने 18 ओव्हरमध्ये शंभरी गाठली आहे. राहुल-रोहित यांनी विश्वकपमध्ये दुसऱ्यांदा शतकी भागिदारी केली आहे. दरम्यान, रोहितने यंदाच्या विश्वकपमधील आपले तिसरे अर्धशतक ठोकले आहेत.याआधी रोहितला तमीम इक्बाल (Tamim Iqbal) नं जीवनदान दिले होते. त्याच्यामागे, राहुलने ही आपले अर्धशतक साजरे केले. हे राहुलचे विश्वकपमधील दूर अर्धशतक आहे. (IND vs BAN, ICC World Cup 2019: वनडे क्रिकेटमध्ये 15 वर्षआधी पदार्पण केल्यानंतर दिनेश कार्तिक ला विश्वकप खेळण्याची संधी)
आजच्या सामन्यात विजय मिळवून भारताला सेमीफायनलमध्ये जागा निश्चित करण्याची संधी आहे. भारतीय संघाचे 7 सामन्यात 11 गुण झाले आहेत. गुणतक्त्यात टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचा संघ 13 गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचेल. पण बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात भारताला सावध राहणे गरजेचे आहे. दुसरीकडे बांगलादेशला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ही शेवटची संधी असेल.
इंग्लंड (England) विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. या विश्वकपमधला भारताचा हा पहिलाच पराभव होता. दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध मॅचमध्ये टीम इंडियाने दोन बदल केले आहेत. केदार जाधव (Kedar Jadhav) च्या ऐवजी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ला संधी देण्यात आली आहे. तर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ऐवजी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) ला संधी देण्यात आली आहे.