(Image Credit: AP/PTI Photo)

आयसीसी (ICC) विश्वकप 2019 मध्ये आज भारत (India) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) लढत एजबस्टन (Edgbaston) येथे सुरु आहे. दोन्ही संघासाठी आजचा सामना सेमीफायनल च्या दृष्टीने महत्वाचा आहे. आजचा सामना जिंकल्यास विराट कोहली (Virat Kohli) चा भारतीय संघ सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित करेल. या आधी भारतीय संघाला यजमान इंग्लंड (England) विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, आजच्या महत्वाच्या सामन्यात टीम ने दोन बदल केला आहेत. दुखापतीनंतर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) संघात परतला आहे तर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ला देखील विश्वकप मध्ये खेळण्याची संधी दिली आहे. (IND vs BAN, CWC 2019: टॉस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय; भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिकचा संघात समावेश)

यष्टिरक्षक कार्तिकने वयाच्या 34 व्या वर्षी विश्वकपमध्ये पदार्पण केले आहेत. याआधी, कार्तिक 2007 मध्ये भारतीय विश्वकपसंघाचा भाग होता परंतु संघ ग्रुप स्टेजमधेच बाहेर पडल्यामुळे त्याला टीमसाठी एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यानंतर त्याची 2011 आणि 2015 च्या विश्वकपसाठी निवड केली गेली नाही. अंततः आजच्या बांग्लादेशविरुद्ध सामन्यात मंगळवारी, कार्तिकने केदार जाधव (Kedar Jadhav) च्या जागी विश्वकपमध्ये पदार्पण केले. आश्चर्याची बाब म्हणजे,कार्तिकने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या आधी पदार्पण केले होते.

दरम्यान, कार्तिकच्या समावेशामुळे पहिल्यांदाच विश्वकपमध्ये प्लेयिंग इलेव्हनमध्ये तीन तज्ञ विकेटकीपर खेळले जात आहेत. कार्तिक, एम एस धोनी (MS Dhoni) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) पहिल्यांदाच एक वनडे सामना एकत्र खेळत आहेत.

कोहली ने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचे 7 सामन्यात 11 गुण झाले आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ 13 गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचेल. दुसरीकडे बांग्लादेशला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ही शेवटची संधी असेल.