कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे भारतीय संघाने बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयसह भारतीय संघाने बांग्लादेशचा 2 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने क्लीन-स्वीप केला आहे. दुसऱ्या डावांत फलंदाजी करताना बांग्लादेशला 195 धावाच करता आल्या. बांग्लादेशकडून मुशफिकुर रहीम याने 96 चेंडूत सर्वाधिक 74धावा केल्या. हॅमस्ट्रिंगमुळे महमुदुल्ला खेळणार नाही. 

मुशफिकुर रहिम चांगले शॉट्स मारत होता. उमेश यादवच्या चेंडूवर अश्याच एका चेंडूवर मोठं शॉट खेळण्याच्या प्रयत्नात रहीम रवींद्र जडेजाकडे कॅच आऊट झाला. रहीमने 74 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार ठोकले.

बांग्लादेश संघाने 34.1 ओव्हरमध्ये 7 गडी गमावून 152 धावा केल्या आहेत. उमेश यादवने इबादत हुसेन ला विराट कोहली च्या हाती कॅच आऊट करत बांग्लादेशला 7 वा झटका दिला. डावाने पराभव टाळण्यासाठी बांग्लादेशला अजूनही 89 धावांची गरज आहे.

कोलकातामध्ये सुरु असलेल्या दुसरा दिवशी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शानदार शतक झळकावले, तर इशांत शर्मा (Ishant Sharma) याने सलग दुसऱ्या डावात भारतासाठी शानदार गोलंदाजी केली, पण रविवारी मुस्तफिजुर रहीम (Mushtfiqur Rahim) याच्या अनुभवी खेळीने बांग्लादेश (Bangladesh) साठी दुसऱ्या टेस्टमध्ये पुनरागमन करण्याच्या आशा कायम ठेवल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पिंक बॉलने कसोटी सामन्यातील विजयाच्या टीम इंडियाला तिसरी दिवसाची वाट पाहावी लागली. कोहलीने 194 चेंडूंत 136 धावा केल्या आणि डे-नाईट कसोटी सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय (India) फलंदाज ठरला. भारताने आपला पहिला डाव नऊ विकेट्सवर 347 धावा करुन घोषित केला आणि अशाप्रकारे 241 धावांची आघाडी मिळविली. तिसऱ्या दिवशी भारताला विजयासाठी 4 विकेटची गरज आहे, तर बांग्लादेश भारताच्या अजून 89 धावा मागे आहे. पहिल्या डावात फक्त 106  बांग्लादेशची दुसऱ्या दावत चांगली सुरुवात झाली नाही फक्त 13 धावांवर फक्त 4 विकेट गमावले. यानंतर, मुशफिकूरने नाबाद 59 धावा करत संघाचा डाव सांभाळण्याची जबाबदारी घेतली आणि बांग्लादेशने दुसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सहा बाद 152 धावा केल्या.

मुशफिकूर वगळता केवळ महमुदुल्ला याला भारतीय गोलंदाजांना सामना करण्यास यश मिळाले. पण, महमुदुल्लाह 39 धावांवर रिटायर्ड हर्ट होत माघारी परतला. पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या इशांत शर्मा याने पुन्हा घातक गोलंदाजी केली आणि आतापर्यंत त्याने 39 धावांत चार विकसित घेतले आहेत.उमेश यादव याने 40 धावांवर उर्वरित दोन गडी बाद केले आहेत. बांग्लादेश फलंदाजांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांची दहशत बनवली होती आणि दुसऱ्या डावात मोहम्मद मिथुन याचा तिसरा शिकार बनला. इशांतचा बाउन्सर मिथुनच्या हेल्मेटला लागला. यापूर्वी, पहिल्या डावात मोहम्मद शमी याच्या बाउन्सरने नईम हसन आणि लिटन दास यांना दुखापत झाल्याने तेही रिटायर्ड हर्ट झाले होते.