चेन्नई: भारत विरुद्ध बांलादेश कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs BAN Test Series 2) 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये कडवी स्पर्धा होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे आहे.
चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची शक्यता?
चाहत्यांसाठी एक वाईट बातमीही आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवसही पावसामुळे वाहून जाऊ शकतो. वास्तविक, Accuweather नुसार, चेन्नईमध्ये पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पावसाची 40 टक्के शक्यता आहे. तिसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN Test Series 2024: भारत - बांगलादेश कसोटी मालिकेतील 'हे' पाच खेळाडू करु शकतात कहर, आपल्या घातक कामगिरीने करणार मोठे 'विक्रम')
पाहा दोन्ही संघाचे खेळाडू
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, सरफराज खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, यश दयाल, आकाश दीप
बांगलादेश संघ: महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), जाकेर अली, मेहदी हसन मिराज, खालेद अहमद, हसन महमूद, तस्किन अहमद, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा