भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी सहा विकेट गमावल्यानंतर भारताने 493 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत उमेश यादव 25 आणि रवींद्र जडेजा 60 धावा करत खेळत आहेत. भारताने बांग्लादेशविरुद्ध 343 धावांची आघाडी मिळविली आहे.
IND 493/6 in 114 Overs | IND vs BAN 1st Test Day 2 Live Score Updates: दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाला मिळाली 343 धावांची आघाडी
भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात इंदोरमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एक विकेट गमावत 86 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडिया बांग्लादेशच्या सध्या 64 धावा मागे आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद 43 तर मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) नाबाद 37 धावांवर खेळत आहेत. यापूर्वी बांग्लादेश संघ पहिल्या डावात 58.3 ओव्हरमध्ये 150 धावांवर ऑल आऊट झाला. यापूर्वी बांग्लादेशने भारताविरुद्ध पहिल्या सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताचा वरचष्मा आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 1 विकेट गमावली होती. आणि आता दुसऱ्या दिवशी संघ मोठा स्कोर करण्याच्या निर्धारित असेल. दुसरीकडे, बांग्लादेशी गोलंदाज भारताला मोठा स्कोर करण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात असतील. बांग्लादेशला 150 धावांवर ऑल-आऊट केल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मयंकने भारताच्या डावाची सुरुवात केली. दोघांमध्ये 14 धावांची भागीदारी झाली असताना रोहित 6 धावांवर बाद झाला.
रोहित बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयंकने दुसर्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली आणि दिवसाखेरीस संघाला अजून कोणताही झटका लागू दिला नाही. मयंक मात्र नशीबवान होता आणि 31 धावांवर त्याला जीवदान मिळाले. इमरूल कयास याने अबू जयाद याच्या चेंडूवर पहिल्या स्लिपवर मयंकचा कॅच सोडला. यानंतर दोन्ही फलंदाजांनी तिसर्या सत्रातील खेळ खेळून काही धावा जोडल्या. बांग्लादेशसाठी मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याने सर्वाधिक 43 धावा केल्या. शिवाय कर्णधार मोमीनुल हक याने 37, लिटन दास 21 आणि मोहम्मद मिथुन याने 13 धावांचे योगदान दिले. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्याच्याशिवाय इशांत शर्मा, उमेश यादव आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अश्विनने यासह टेस्ट क्रिकेटमधील घरच्या मैदानावर खेळताना 250 बळी पूर्ण केले आहेत. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या घरच्या मैदानावर खेळताना सर्वात जलद 250 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने मुरलीधरनची बरोबरी करत 42 सामन्यात हा पराक्रम केला आहे. अश्विनने या प्रकरणात भारताचा माजी कर्णधार आणि महान फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) याला मागे टाकले आहे. कुंबळेने घरच्या मैदानावर43 टेस्ट सामन्यात ही कामगिरी बजावली होती.