Team India (Photo Credit - X)

टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचं लक्ष ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची हॅट्रिक करण्यावर असणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने ठिकाणांची घोषणा केली आहे. या कसोटी मालिकेत काही सामने दिवसा तर काही सामने दिवस रात्र असे खेळवले जाणार आहे.  कसोटी चॅम्पपीयनशीपच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी ही कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे.  (हेही वाचा - ICC Test Rankings: बुमराहचे नुकसान! अश्विन आयसीसी कसोटी क्रमवारीत ठरला अव्वल क्रमांकाचा गोलंदाज; टॉप-10 मध्ये अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये रंगणार आहे. तर दुसरा कसोटी सामना हा डे-नाईट सामना असणार आहे. हा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील तिसरा सामना गाबाच्या मैदानावर रंगणार आहे. तर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना 26 डिसेंबर रोजी रंगणार आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना 2025 च्या सुरुवातीला खेळला जाणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौरा हा भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मालिका ऑस्ट्रेलियात असल्याने ऑस्ट्रेलियाचं पारडं जड असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर तिसऱ्या न्यूझीलंडचा संघ आहे. टॉप २ मध्ये टीकून राहण्यासाठी तिन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.