India vs Australia ODI Series 2019: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. यात विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे कर्णधार ( Captain) तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर उपकर्णधार (Vice Captain) म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. दरम्यान, लोकेश राहुल (L Rahul) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्यासाठी निवडकरत्यांनी मोठी संधी दिली आहे. कारण, या मालिकेच्या रुपात लोकेश राहुल यांचे पुनरागमन तर, भुवनेश्वर कुमार याला शेवटच्या तीन सामन्यांमध्ये मैदान गाजवण्याची संधी मिळणार आहे. अर्थात या संधीचे दोघेही कसे सोने करतात हे प्रत्यक्ष मैदानावरच कळणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये एकमेकांना भिडतील. एकून चार सामन्यांची ही मालिका असेल. पाचवा सामना अंतिम असेल. असे मिळून हे दोन्ही संघ पाच सामने खेळतील. या सामन्यांच्या वेळापत्रकानुसार पहिला एकदिवसीय सामना हैदराबाद (2 मार्च), दुसरा सामना एकदिवसीय सामना नागपूर (5 मार्च), तीसरा एकदिवसीय सामना रांची (8 मार्च) आणि चौथा एकदिवसीय सामना 10 मार्च रोजी मोहाली येथे होईल. तर अंतिम एकदिवसीय सामना राजधानी दिल्ली येथे 13 मार्च रोजी खेळला जाईल. (हेही वाचा, India vs Australia T20 Series 2019: ऑस्टेलिया विरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा)
पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ असा-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल.
तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या (अंतीम) सामन्यांसाठी भारतीय संघ असा-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, विजय शंकर, ऋषभ पंत, लोकेश राहुल.
दरम्यान, उभय देशांमध्ये होत असलेली ही विश्वचषकापूर्वीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील अखेरची मालिका असणार आहे. कारण त्यानंतर 23 मार्चपासून आयपीए (IPL) चे आयोजन केले जाईल. दुसऱ्या बाजूला ऑस्टेलियाचा संघ भारताविरुद्धची मालिका संपल्यावर पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे.