India vs Australia T20 Series 2019: ऑस्टेलिया विरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

मालिकेतील पहिला सामना येत्या 2 मार्च रोजी हैदराबाद येथे होईल. तर, दुसरा सामना नागपूर येते 5 मार्च रोजी खेळला जाणार आहे. तीसरा सामना 8 मार्चला रांची येथ तर, चौथा 10 मर्च रोजी मोहालीच्या मैदानावर रंगेल. अंतिम सामना 13 मार्च रोजी राजधानी दिल्ली येथे खेळला जाईल.

India vs Australia T20 Series 2019: ऑस्टेलिया विरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
Indian cricket team | (Photo: IANS)

India vs Australia 2019 Series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) आज (शुक्रवार, 15 फेब्रवारी) घोषीत झाला. यात कर्णधार ( Captain) विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे संघाची धुरा असणार आहे. तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर उपकर्णधार (Vice Captain) पदाची जबाबदारी आहे. टी-20 (T-20) मालिकेसाठी दोन्ही संघ (India vs Australia) एसदिवसीय सामने खेळतील.

दरम्यान, मालिकेतील पहिला सामना येत्या 2 मार्च रोजी हैदराबाद येथे होईल. तर, दुसरा सामना नागपूर येते 5 मार्च रोजी खेळला जाणार आहे. तीसरा सामना 8 मार्चला रांची येथ तर, चौथा 10 मर्च रोजी मोहालीच्या मैदानावर रंगेल. अंतिम सामना 13 मार्च रोजी राजधानी दिल्ली येथे खेळला जाईल. दरम्यान, उभय देशांमध्ये होत असलेली ही विश्वचषकापूर्वीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील अखेरची मालिका असणार आहे. कारण त्यानंतर 23 मार्चपासून आयपीए (IPL) चे आयोजन केले जाईल. दुसऱ्या बाजूला ऑस्टेलियाचा संघ भारताविरुद्धची मालिका संपल्यावर पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे.  (हेही वाचा, माजी भारतीय खेळाडूवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला, हॉकी स्टिक आणि काठ्यांनी मारहाण केल्याने गंभीर जखमी)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ असा-

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, क्रूणाल पांड्या, विजय शंकर, युजवेंद्र चहल, सिद्धार्थ कौल, मयंक मारकंडे, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2019 05:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).