India Vs Australia 2nd T20I : नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: IANS)

India Vs Australia 2nd T20I : भारत ऑस्ट्रेलिया मालिकेचा दुसरा सामना आज ऑस्ट्रेलियाच्या एमसीजी मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक (Toss) जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) घेतला आहे.

बुधवारी ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 4 धावांनी पराभूत केले होते. त्यामुळेच तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ हा 1-0 ने पुढे आहे.

असे असतील दोन्ही संघ-

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद.

ऑस्ट्रेलिया संघ

आरोन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, क्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल, जॅसन बेहरेनडोर्फ, नाथन कूल्टर नाइल, बेन मॅकडरमोट, मार्कस स्टोइनिस, एंड्रयू टाय, एडम जंपा.