India Tour of England 2021: जून महिन्यात इंग्लंड दौर्यावर (England Tour) असणाऱ्या भारतीय पुरुष आणि महिला संघांना सोमवारी मोठी सुखद बातमी मिळाली आहे कारण खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्यांना त्यांच्या कुटुंबीयांना आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी घेऊन जाण्यास ब्रिटन (United Kingdom) सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. सध्या मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेला भारतीय संघ (Indian Team) आपल्या कुटुंबासोबत 3 जून रोजी लंडनला चार्टर्ड विमानाने पोहचतील. त्यानंतर संपूर्ण संघ साऊथॅम्प्टनला (Southampton) रवाना होईल जेथे ते व्यवस्थापित आयसोलेशनमध्ये वेळ घालवतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) अद्याप साऊथॅम्प्टनमध्ये भारताचा आयसोलेशन कालावधीची अद्याप नमूद केलेला नाही. त्यांच्या क्वारंटाईन कालावधीत नियमित चाचण्या घेतल्या जातील. (IND vs ENG Test: आयपीएल 2021 साठी बदलले जाईल इंग्लंड विरोधात टीम इंडियाच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक? ECB ने दिले स्पष्टीकरण)
विराट कोहलीचा भारतीय संघ 18 जूनपासून इंग्लंडमध्ये 6 कसोटी सामने खेळणार आहे तर महिला संघाचा (India Women's Team) 6 सामने व्हाइट बॉल खेळण्यापूर्वी एका कसोटी सामन्यात यजमान संघाविरुद्ध मैदानात उतरतील. दुसरीकडे, भारतीय पुरुष संघ जून ते 14 सप्टेंबर दरम्यान यूकेमध्ये असेल. 18 जूनपासून साऊथॅम्प्टन येथे सुरू होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात त्यांची टक्कर न्यूझीलंडशी होईल त्यानंतर 4 ऑगस्टपासून ते यजमान इंग्लिश टीम विरोधात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. दरम्यान, WTC ला यूके सरकारने मानक कोविड-19 प्रोटोकॉलमधून सूट दिली आहे. आयसीसीने शनिवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “17 मे 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या हेल्थ प्रोटेक्शन (कोरोना व्हायरस, इंटरनॅशनल ट्रॅव्हल अँड ऑपरेटर लायबिलिटी) (इंग्लंड) रेग्युलेशन 2021 मध्ये नमूद केल्यानुसार, या कार्यक्रमास आता ब्रिटन सरकारने सूट दिली आहे.”
UK Tour: Indian players pleased as punch as BCCI gets travel clearance for families
Read @ANI Story | https://t.co/KB9IdjdkJd pic.twitter.com/6Y5BsV4rxb
— ANI Digital (@ani_digital) June 1, 2021
आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले की .... लँडिंगनंतर ते थेट हॅम्पशायर बाऊलच्या साइटवरील हॉटेलमध्ये जातील. जिथे व्यवस्थापकीय आयसोलेशनची सुरुवात करण्यापूर्वी त्यांची पुन्हा चाचणी होईल.” दरम्यान, भारतीय महिला संघ 16 जून पासून मिताली राजच्या नेतृत्वात ब्रिस्टल येथे 2014 नंतर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. यांनतर 3 सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळली जाणार आहे. टी-20 मालिकेसाठी हरमनप्रीत कौर संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळेल.