![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/01/u19-team.jpg?width=380&height=214)
ICC U19 Women's T20 World Cup 2025 Points Table Updated: आयसीसी अंडर 19 महिला टी20 विश्वचषक 2025 स्पर्धेची दुसरी आवृत्ती 18 जानेवारीपासून सुरू झाली आहे. अंडर 19 महिला टी20 विश्वचषकात भारत या स्पर्धेचा गतविजेता आहे. भारताने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत इंग्लंडला हरवून पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावले होते. नवीन संघात नेपाळ, नायजेरिया आणि सामोआ यांचा समावेश आहे. संघांना चार गटात विभागले गेले आहे. प्रत्येक गटात चार संघ आहेत आणि प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर तीन संघांशी एकदा खेळेल.(India Women U19 vs Malaysia Women U19 Scorecard: भारताचा सलग दुसरा विजय; अवघ्या 2.5 षटकांत गाठले मलेशियाचे 32 धावांचे लक्ष)
आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी 20 विश्वचषक संघ आणि गट
गट अ: भारत, मलेशिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज
गट ब: इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका
गट क: न्यूझीलंड, नायजेरिया, सामोआ, दक्षिण आफ्रिका
गट ड: ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, स्कॉटलंड
आयसीसी अंडर 19 महिला टी 20 विश्वचषक 2025 गुण तालिका:
संघ सामने जिंकले पराभूत एनआर गुण एनआरआर
1 भारत 2 2 0 0 4 +9.148
2 श्रीलंका 2 0 0 4 4 +5.500
3 मलेशिया 2 0 2 0 0 -5.528
4 वेस्ट इंडिज 2 0 2 0 0 -7.146
गट ब
संघ सामने जिंकले पराभूत एनआर गुण एनआरआर
1 यूएसए 2 1 0 1 3 +4.422
2 इंग्लंड 2 1 0 1 3 +3.879
3 पाकिस्तान 2 0 1 1 1 -3.879
4 आयर्लंड 2 0 1 1 1 -4.422
गट क
संघ सामने जिंकले पराभूत एनआर गुण एनआरआर
1 दक्षिण आ. 2 2 0 0 4 +5.784
2 नायजेरिया 2 1 0 1 3 0.154
3 सामोआ 2 0 1 1 1 -9.400
4 न्यूझीलंड 2 0 2 0 0 -1.000
गट ड
संघ सामने जिंकले पराभूत एनआर गुण एनआरआर
1 ऑस्ट्रेलिया 2 0 0 4 +1.948
2 बांगलादेश 2 1 1 0 2 +1.375
3 स्कॉटलंड 2 1 1 0 2 -1.420
4 नेपाळ 2 0 2 0 0 0.844
सामन्यातील विजेत्या संघाला दोन गुण मिळतात. सामना रद्द झाल्यास संघाला प्रत्येकी एक गुण मिळतो. गट अ मध्ये गतविजेत्या भारत महिला, श्रीलंका महिला आणि वेस्ट इंडिज महिला संघांचा समावेश आहे. गट ब मध्ये अमेरिका महिला, इंग्लंड महिला, आयर्लंड महिला आणि पाकिस्तान महिलांचा समावेश आहे. गट क मध्ये दक्षिण आफ्रिकन महिला, सामोआ महिला, नायजेरिया महिला आणि न्यूझीलंड महिलांचा समावेश आहे. गट ड मध्ये ऑस्ट्रेलिया महिला, बांगलादेश महिला, नेपाळ आणि स्कॉटलंड महिलांचा समावेश आहे.