AUS Team (Photo Credit - X)

Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट राखुन पराभव केला आहे. तसेचा त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीटही मिळालं आहे. 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारताकडून हिसकावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे. टीम इंडियाने यजमानांना विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे कांगारूंनी 4 गडी गमावून पूर्ण केले. या पराभवामुळे भारताने केवळ मालिका गमावली नाही तर सलग तिसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याची संधीही गमावली. आता डब्ल्यूटीसी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

येथे वाचा संपूर्ण स्कोरकार्ड

भारत पहिल्या डावात 185 ऑलआऊट

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची वाईट सुरुवात झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाले. त्यानंतर पुनरागमन करणारा शुभमन गिल (20) धावा करुन बाद झाला. विराट कोहली थोडा वेळ लयीत दिसला पण शेवटी ऑफ स्टॅम्पच्या बाॅलचा बळी ठरला. त्यानंतर पंत आणि जडेजाने संघाची हाती कमान घेतली. त्यांनी थोडा वेळ घेत स्कोरबोर्ड चालू ठेवला. पण मोठ्या शाॅट मारण्याच्या नादात पंत त्याची मोठी विकेट देवुन बसला. त्यानंतर सगळ्यांनी विकेट फेकल्या आणि भारत पहिल्या डावात 185 ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना स्कॉट बोलंड आणि मिचेस स्टार्कने कहर केला. स्टार्कने (3) आणि बोलंड (4) विकेट घेतल्या. तर कॅमिन्सला (2) आणि लायनला (1) विकेट मिळाली.

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ 181 धावांवर आटोपला

ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्याच दिवशी डावाची सुरुवात केली. पहिल्या दिवशी शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची वाईट सुरुवात झाली. मार्नस लॅबुशेनला (2) आणि कॉन्स्टास (23) धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 39 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कोणताही कांगारु फलंदाज जास्तवेळ टीकू शकले नाही. वेबस्टरच्या 57 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 181 धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने प्रत्येकी (3-3) विकेट घेतल्या. तर बुमराह आणि नितीन रेड्डीने प्रत्येकी (2-2) विकेट घेतल्या.

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी केली निराशा

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि संपूर्ण संघ 157 धावांत गडगडला. आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य मिळाले. पहिल्या डावानंतर भारताकडे 40 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा ऋषभ पंत होता, ज्याने 33 चेंडूत 61 धावा केल्या, त्याच्याशिवाय कोणीही 22 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने 6 विकेट घेतल्या, पहिल्या डावातही त्याला 4 यश मिळाले.

ट्रॅव्हिस हेड आणि ब्यू वेबस्टरने कांगारुना मिळवून दिला विजय

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सॅम कॉन्स्टास (22), उस्मान ख्वाजा (41), मार्नस लॅबुशेन (6) आणि स्टीव्ह स्मिथ (4) यांचे विकेट गमावले. यानंतर ट्रॅव्हिस हेड (34*) आणि ब्यू वेबस्टर (39*) यांनी 46 धावांची नाबाद भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. भारत दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराहशिवाय उतरला. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याच्या जागी विराट कोहली कर्णधार झाला. भारताकडून प्रसिध कृष्णाने तीन, तर सिराजला एक विकेट मिळाली.