Sachin Tendulkar: क्रिकेटमध्ये कायम मास्टर-ब्लास्टरचा दबदबा, बनला 21व्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज; या श्रीलंकन दिग्गजाने दिली काट्याची टक्कर
सचिन तेंडुलकर (Photo Credits: Getty Images)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2013 मध्ये निवृत्ती घेल्यावर देखील भारताचा महान फलंदाज आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar0 खेळत जळवा अद्यापही कायम आहे. महान क्रिकेटपटू तेंडुलकरला 21 व्या शतकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवडले गेले आहे. स्टार स्पोर्ट्स (Star Sports) पोलमध्ये तेंडुलकरने श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा (Kumar Sangakkara) 21व्या शतकाच्या महान फलंदाजाच्या (Greatest Men's Test Batsman) शर्यतीत पराभव केला आणि मान मिळवला. स्टार स्पोर्ट्सच्या कमेन्ट्री पॅनेलमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठाण आणि आकाश चोप्रा या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. गावस्कर म्हणाले की, 21व्या शतकातील महान फलंदाजांच्या शर्यतीत सचिन आणि संगकारा यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एजस बाउल येथे आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी चहाच्या वेळी ही घोषणा करण्यात आली. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधील 21 व्या शतकाचा महान खेळाडू निवडण्याचा अनोखा उपक्रम स्टार स्पोर्ट्सने, भारताच्या आघाडीच्या स्पोर्ट्स ब्रॉडकास्टरने, सुरु केला. स्टार स्पोर्ट्सच्या चार प्रकारातील फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू आणि कर्णधार असे एक महान खेळाडू निवडले जातील. त्यासाठी फलंदाजांच्या गटात सचिन तेंडुलकर, स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा, जॅक कॅलिस, तर गोलंदाजात मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, डेल स्टेन, ग्लेन मॅकग्रा, अष्टपैलू गटात जॅक कॅलिस, बेन स्टोक्स, अँड्र्यू फ्लिंटॉफ, रविचंद्रन अश्विन आणि कर्णधार गटात स्टीव्ह वॉ, ग्रीम स्मिथ, रिकी पॉन्टिंग आणि विराट कोहली यांना उमेदवारी मिळाली.

आठ वर्षांपूर्वी 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या तेंडुलकरसाठी हा मोठा सन्मान आहे. सचिन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक 15921 धावा करणारा फलंदाज ठरला आहे आणि त्याच्या 51 शतके हेदेखील कोणत्याही फलंदाजाद्वारे केलेल्या फॉरमॅटमध्ये सर्वात जास्त आहेत. अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न - भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान - पद्मभूषण, पद्मविभूषण आणि त्यातील सर्वांत मोठा म्हणजे भारतरत्न यासह तेंडुलकरला भारतातील सर्व क्रीडा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.