India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने पहिला टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा टी-20 सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसरीकडे, टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी मिळवायची आहे, तर बांगलादेश संघाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने बांगालदेशसमोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Diwali has come early in Delhi 💥
🔗 https://t.co/CBhsGt8i18 | #INDvBAN pic.twitter.com/SzxgbphzNy
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 9, 2024
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. भारताचे सलामीवीर लवकरच बाद झाले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर येणारा कर्णधार सूर्यकुमार यादवही 8 धावा करुन बाद झाला. त्यानंतर नितेश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. नितेश रेड्डीने आपले पहिले अर्धशतक झळकावले. त्याने 74 धावांची वादळी खेळी केली. तर त्याला साथ देत रिंकू सिंगने 53 धावा केल्या. तर हार्दिक पांड्यानेही 32 धावा जोडल्या. यासह भारताने 20 षटकात नऊ विकेट गमावून 221 धावा केल्या.
दुसरीकडे, बांगलादेशकडून तस्किन अहमदने पहिले यश मिळवून दिले. बांगलादेशकडून रिशाद हुसैनने सर्वाधिक तीन बळी घेतले. रिशाद हुसेन, हुसेन तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेश संघाला 20 षटकात 222 धावा करायच्या आहेत. बांगलादेश संघ हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधू इच्छितो.