Rohit Sharma Milestone: रोहित शर्मासाठी भारत - इंग्लड कसोटी मालिका असेल खास, धोनी-सेहवागला टाकू शकतो मागे
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

IND vs ENG Test Series 2024: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका गुरुवार 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. इंग्लंडने एक दिवस अगोदर आपली प्लेइंग 11 जाहीर केली. या मालिकेत रोहित शर्मा एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतो. (हे देखील वाचा: KS Bharat Dedicates Century to Shree Ram: केएस भरतने रामाला समर्पित केलं इंग्लंड लायन्सविरुद्धचे शतक; हवेत धनुष्यबाणाप्रमाणे फिरवली बॅट, पहा व्हिडिओ)

वीरेंद्र सेहवाग आणि एमएस धोनीला मागे सोडू शकतो

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी ही मालिका खास असणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवू शकतो. या मालिकेत रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज बनू शकतो. माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सेहवागच्या नावावर 91 षटकार आहेत.

पहिला भारतीय फलंदाज होण्याच्या मार्गावर

याशिवाय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये 78 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर, रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये 77 षटकार ठोकले आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 14 षटकार मारले तर रोहित कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज बनेल.

मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये

मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला जाणार असून, त्यासाठी आता टीम इंडियाचे खेळाडू हैदराबादला पोहोचले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ही 5 सामन्यांची मालिका दोन्ही संघांसाठी खूप खास आहे. भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, जर संघाने ही मालिका जिंकली तर ते पहिल्या स्थानावर घट्टपणे पोहोचेल. तर इंग्लंडचा संघ सातव्या स्थानावर आहे. अशा स्थितीत इंग्लंडचा संघही ही मालिका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.