KS Bharat Dedicates Century to Shree Ram: भारतीय यष्टीरक्षक केएस भरत (KS Bharat) ने इंग्लंड लायन्सविरुद्धचे शतक भगवान रामाला (Lord Ram) समर्पित केले. शतक पूर्ण केल्यानंतर त्याने मैदानावरच ‘धनुष्यबाण’ मारण्याची अॅक्शन करून ही कामगिरी केली. अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे संपूर्ण देश रामनामात तल्लीन झाला आहे. सध्या देशभरात राम मंदिराच्या अभिषेक संदर्भात उत्साहाचे वातावरण आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी क्रिकेटपटूंपासून ते चित्रपटातील सुपरस्टारही उत्सुक आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतने शतक झळकावल्यानंतर आपली खेळी श्री रामला समर्पित केली, ज्याचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारत आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना अहमदाबाद येथे १७ ते २० जानेवारी दरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारत अ संघातर्फे सहभागी झालेला यष्टिरक्षक फलंदाज भरतने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. शतक झळकावल्यानंतर त्याने आपली बॅट धनुष्य-बाणासारखी बाहेर काढली आणि आपले शतक श्री रामला समर्पित केले, ज्याचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या सामन्यात भरतने 165 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 116 धावा केल्या होत्या.
पहा व्हिडिओ -
KS Bharat dedicated his century against England Lions to Shree Ram ahead of the 'Pran Pratishtha'.
- Bharat did bow & arrow celebration...!!!!#INDvENG pic.twitter.com/TQaBujyENn
— Akash. (@akashujjwa59571) January 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)