
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) 12 वा सामना आज 2 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs NZ) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले आहे. तसेच उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रलियासोबत होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा संघ 45.3 षटकात गारद झाला.
CT 2025. India Won by 44 Run(s) https://t.co/Ba4AY30p5i #NZvIND #ChampionsTrophy
— BCCI (@BCCI) March 2, 2025
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची वाईट सुरुवात झाली. दोन्ही सलामीवीरने स्वस्तात विकेट गमावल्या. त्यानंतर विराट कोहली 11 धावांवर बाद झाला. मग श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने 98 धावांची भागीदारी रचली. श्रेयस अय्यरने 79 धावांची शानदार खेळी केली. श्रेयस अय्यर व्यतिरिक्त हार्दिक पंड्याने 45 धावा केल्या. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत नऊ विकेट गमावून 249 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. मॅट हेन्री व्यतिरिक्त काइल जेमिसन, रचिन रवींद्र, विल्यम ओ'रोर्क आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवातही निराशाजनक झाली आणि संघाचे दोन फलंदाज केवळ 49 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. संपूर्ण न्यूझीलंड संघ 45.3 षटकांत फक्त 205 धावांवर ऑलआउट झाला. न्यूझीलंडकडून अनुभवी फलंदाज केन विल्यमसनने 81 धावांची सर्वोत्तम खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, केन विल्यमसनने 120 चेंडूत सात चौकार मारले. केन विल्यमसन व्यतिरिक्त कर्णधार मिचेल सँटनरने 28 धावा केल्या.
वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक पाच विकेट्स
टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या. आता सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. दोन्ही संघांमधील हा सामना 4 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.