IND vs AUS: भारतीय महिला क्रिकेट संघ आज 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रलिया सोबत खेळत आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसऱ्या टी-20 सामान्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. दोन्ही संघाने 20 ओवर मध्ये 187 धावा करत लक्ष साधल्याने सामना थेट सुपर ओवर मध्ये येवून पोहचला. तरी भारतीय वाघिणींनी सुपर ओवरमध्ये आपली कमाल दाखवत कांगारुंना हार पत्कारावी लागली. तसेच भारतीय महिला संघाने या मालिकेत बरोबरीने केला आहे. त्याचबरोबर आजचा सामना जिंकून मालिकेत आपली आघाडी आणखी मजबूत करण्याकडे दोन्ही संघाचे लक्ष असणारआहे. (हे देखील वाचा: IND vs BAN 1st Test 2022 Live Streaming Online: वनडेनंतर कसोटी मालिकेत भारत विरुद्ध बांगलादेश आमनेसामने, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना)
भारत आणि ऑस्ट्रेलिया माहिला संघ यांच्यातील तिसरा टी-20 सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?
तिसरा टी-20 सामना 14 डिसेंबरला म्हणजे आज खेळवला जाणार आहे. तसेच हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 सामना कधी सुरू होईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल.
सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
मालिकेतील तिसऱ्या सामन्याचे प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.
फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी पाहणार?
तुम्ही Disney+ Hotstar वर भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.