IND vs A vs AFG A (Photo Credit - ACC & X)

Emerging Asia Cup 2024 2nd Semi Final: सध्या ओमानमध्ये इमर्जिंग आशिया कप 2024 सुरू (Emerging Asia Cup 2024) आहे. भारत अ संघाने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तान अ संघाशी (IND A vs AFG A) होणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही आणि उपांत्य फेरीतही ही गती कायम ठेवण्याची इच्छा आहे. आज 25 ऑक्टोबर रोजी होणारा हा सामना संघाने जिंकला तर तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. (हे देखील वाचा: Emerging Asia Cup 2024 Semi-Final Line Up: सेमीफायनलमध्ये 'या' 4 संघांनी केली धमाकेदार एंट्री, टीम इंडियाचा उपांत्य फेरीत कोणाशी होणार सामना?)

सामन्याबद्दल माहिती

दिनांक- 25 ऑक्टोबर, शुक्रवार

वेळ- संध्याकाळी 7.00 (भारतीय वेळनुसार)

स्थळ- अल अमेरत क्रिकेट ग्राउंड, मस्कत, ओमान

कुठे पाहणार सामना?

हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स 1 वर प्रसारित केला जाईल. तसेच, ऑनलाइन स्ट्रीमिंग- डिस्ने+ हॉटस्टार आणि फॅनकोड ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंग केले जाईल. मोफत स्ट्रीमिंग- हा सामना यूट्यूबवर ACC च्या अधिकृत चॅनेलवर विनामूल्य पाहता येईल.

अंतिम फेरीत भारताचा सामना कोणत्या संघाशी होऊ शकतो?

जर भारत अ ने हा उपांत्य सामना जिंकला तर अंतिम फेरीत त्यांचा सामना पाकिस्तान अ किंवा श्रीलंका अ संघाशी होईल. भारत विरुद्धच्या सामन्यापूर्वी या दोन्ही संघांची उपांत्य फेरी होणार आहे. फायनलमध्ये कोण पोहोचेल याची चाहत्यांना प्रतीक्षा असेल.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारत अ- अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रमणदीप सिंग, तिळक वर्मा (कर्णधार), अनुज रावत, हृतिक शौकीन, रविश्रीनिवासन साई किशोर, राहुल चहर, आयुष बडोनी, नेहल वढेरा, रसिक दार सलाम, अंशुल कंबोज, आकीब खान, वैभव अरोरा, निशांत सिंधू.

अफगाणिस्तान अ- जुबैद अकबरी, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसौली (कर्णधार), करीम जनात, शाहीदुल्ला कमाल, मोहम्मद इशाक (विकेटकीपर), शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, अल्लाह गझनफर, फरीदून दाऊदझाई, बिलाल सामी, नांगेलिया खरोटे, वफीउल्लाह शाह, वफीउल्लाह तरखिल, अब्दुल रहमान.