रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

India 1st ODI Likely Playing XI: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात 6 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. यापूर्वी टीम इंडियाला  (Team India) कोविड-19 चा जोरदार फटका बसला आहे. शिखर धवन, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड यांच्यासह भारतीय ताफ्यातील 7 जणांना कोरोनाची सकारात्मक लागण झाली आहे. आता या सर्वांना सात दिवस अनिवार्य आयसोलेशनमध्ये रहाणे गरजेचे असल्याने ते मालिकेतून बाहेर पडले आहेत. तर केएल राहुल (KL Rahul) सलामीच्या सामन्यासाठी उपलब्द नाही आहे. विंडीजविरुद्ध भारतीय संघ (Indian Team) कोणत्या संयोजनाने मैदानात उतरणार यावर अजून संभ्रमाची स्थिती बनली आहे. त्यामुळे पहिल्या वनडे सामन्यासाठी कोरोना प्रभावित टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन (Team India Playing XI) कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. (IND vs WI 1st ODI: मयंक अग्रवालनंतर ‘हा’ धाकड फलंदाज आता टीम इंडियाच्या ताफ्यात, रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करणार?)

सलामी जोडी

पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्मा पहिल्या सामन्याने सुरुवात करेल. तथापि यावेळी त्याच्यासोबत धवन आणि राहुल नसतील. तर रुतुराज गायकवाडसुद्धा पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. याचा अर्थ रोहित नुकतेच ड्राफ्ट केलेले खेळाडू मयंक अग्रवाल किंवा ईशान किशन यांच्यासोबत सलामीला येतील. पण भारतीय शिबिरातून येत असलेल्या चर्चांनुसार किशनला पहिल्या सामन्यासाठी रोहितचा जोडीदार म्हणून पहिली पसंत आहे.

दीपक हुडा पदार्पणासाठी सज्ज

श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल उपलब्ध नसल्यामुळे आता दीपक हुडा भारतासाठी पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. हुडा यापूर्वी दोन वेळा भारतीय संघाचा भाग होता पण त्याला कधी पदार्पणाची संधी मिळाली नाही. मधल्या षटकांमध्ये संघाला गरज पडल्यास पुढाकार घेण्याची हुडाची क्षमता तसेच त्याची पार्ट-टाइम गोलंदाजी संघासाठी फायदेशीर ठरेल.

मधली फळी

या सामन्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विराट कोहली प्रथमच रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळेल. 2019 मध्ये भारताच्या विंडीज दौऱ्यापासून कोहलीने शतक झळकावलेले नाही आणि 33 वर्षीय खेळाडू हिशोब बरोबरी करू इच्छित असेल.सूर्यकुमार यादव चौथ्या आणि रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर आपले स्थान कायम ठेवेल.

गोलंदाजी क्रम

मोहम्मद सिराज भारतीय गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल आणि प्रसिद्ध कृष्णा त्याचा गोलंदाजी जोडीदार असेल. जसप्रीत बुमराहला मालिकेसाठी विश्रांती दिल्याने कृष्णाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल. तसेच शार्दूल ठाकूरच्या पुढे दीपक चाहरला संधी मिळेल.

भारताचे संभाव्य प्लेइंग XI: रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, दीपक चाहर, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, आणि मोहम्मद सिराज.