Photo Credit- X

India Women U19 vs Scotland Women U19 Live Streaming: आयसीसी महिला अंडर 19 टी-20 विश्वचषक 2025 च्या आजच्या सामन्यात मंगळवारी 28 जानेवारी रोजी भारत महिला अंडर 19 संघाचा स्कॉटलंड महिला अंडर 19 संघाशी (IND-W vs SCO-W) सामना होणार आहे. हा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे होणार आहे. रविवार, 26 जानेवारी रोजी सुपर सिक्स सामन्यात भारताने बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले होते.(Ranji Trophy 2024-25 Scenarios: अंतिम फेरीपूर्वी, क्वार्टरफायनलमध्ये 15 संघ अजूनही शर्यतीत; मुंबई आणि कर्नाटक क्वार्टरफायनलमध्ये कसे पात्र ठरू शकतात?)

निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील संघ मंगळवारीही स्पर्धेत आपला विजयी लय कायम ठेवू इच्छितो. सते झाल्यास हा भारताचा सलग पाचवा विजय असेल. भारतासाठी, गोंगाडी त्रिशा आणि वैष्णवी शर्मा यांनी आतापर्यंत अनुक्रमे बॅट आणि बॉलने त्यांच्या कामगिरीने अनेकांची मने जिंकली आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा त्यांच्याकडून दमदार खेळाची अपेक्षा आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त, जी कमलिनी, सानिका चालके, आयुषी शुक्ला, शबनम एमडी आणि जोशिता व्हीजे या खेळाडूंकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

आज मंगळवार, 28 जानेवारी रोजी क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे सुरू असलेल्या आयसीसी अंडर 19 महिला टी 20 विश्वचषक 2025 मध्ये सुपर सिक्स ग्रुप 1 मध्ये भारताचा सामना स्कॉटलंडशी होईल.

नाणेफेक: सकाळी 11:30

तारीख/वेळ: मंगळवार, 28 जानेवारी दुपारी 12 वाजता

स्थळ: बायुमास ओव्हल, क्वालालंपूर

थेट प्रक्षेपण: थेट प्रक्षेपण डिस्ने+ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

संघांचे खेळाडू

भारत महिला अंडर 19 संघ: गोंगडी त्रिशा, जी कमलिनी (विकेटकीपर), सानिका चाळके, निकी प्रसाद (कर्णधार), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्ही जे, शबनम मो. शकील, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा, भाविका अहिरे, धृतीश के, यानंद केश, यानीश

स्कॉटलंड महिला अंडर 19 संघ: पिप्पा केली, एम्मा वॉल्सिंगहॅम, पिप्पा स्प्रॉल (विकेटकीपर), नियाम मुइर (कर्णधार), नायमा शेख, अमेली बाल्डी, गॅब्रिएला फॉन्टेनला, रोझी स्पीडी, मैसी मॅसेरा, किर्स्टी मॅकॉल, मॉली बार्बर स्मिथ, लुसी फॉरेस्टर स्मिथ, चर्नाटे पार्क, मॉली बार्बोर स्मिथ, मॉरीन पार्क