Indian Women's National Cricket Team vs Ireland Women's National Cricket Team 2nd ODI 2025 Live Streaming: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 12 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत 238 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. आता भारत दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, आयर्लंड संघ भारताविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना जिंकू इच्छितो. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो. (हेही वाचा - Smriti Mandhana Milestone: स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय फलंदाज)
भारत महिला आणि आयर्लंड महिला संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?
भारत महिला आणि आयर्लंड महिला संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना रविवार, 12 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजता राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.
भारतीय महिला आणि आयर्लंड महिला संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना कुठे पाहायचा?
भारतात, भारतीय महिला आणि आयर्लंड महिला एकदिवसीय मालिका स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत, चाहते येथून दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
दोन्ही संघांचे पथके
भारतीय संघ: स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, उमा छेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिस्ट, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तितस साधू, साईमा ठाकोर, सायली सातघरे
आयर्लंड संघ: गॅबी लुईस (कर्णधार), अवा कॅनिंग, क्रिस्टीना कुल्टर-रेली, अलाना डालझेल, लॉरा डेलानी, जॉर्जिना डेम्पसी, सारा फोर्ब्स, अर्लीन केली, जोआना लॉफरन, एमी मॅग्वायर, लीह पॉल, ओर्ला प्रेंडरगास्ट, उना रेमंड-होई, फ्रेया सार्जेंट, रेबेका स्टोएकेल