भारत महिला टीम (Photo Credit: PTI)

IND W vs ENG W 3rd T20I: इंग्लंड (England) आणि भारत महिला (India Women) संघात तिसरा व अखेरचा टी-20 सामना आज खेळला जाणार आहे. बुधवारी हेदर नाइटच्या (Heather Knight) इंग्लंड महिला संघाविरुद्ध हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) टीम इंडियाकडे (Team India) इतिहास रचण्याची संधी आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. उल्लेखनीय म्हणजे भारतीय संघाने देशात किंवा ब्रिटनमध्ये इंग्लंडविरुद्ध एकही टी-20 मालिका जिंकलेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचा शेवटचा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11:00 वाजता सुरू होईल. तिसरा टी-20 सामना भारतीय चाहत्यांसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. तसेच ऑनलाईन स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अ‍ॅपवर पहिले जाऊ शकते. (IND W vs ENG W 2021: हरलीन देओल बनली सुपरवुमन, बाउंड्री लाईनवर पकडला धमाकेदार कॅच; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल 'वाह'!)

दरम्यान, इंग्लंड दौर्‍यावर एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राहिला तर त्यानंतर एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला 2-1 असा पराभव पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने 15 वर्षानंतर पहिल्यांदा इंग्लंडचा घरच्या टी-20 सामन्यात प्रभाव केला होता. यापूर्वी 2006 मध्ये भारताने पहिला विजय मिळविला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त उंचावला आहे. भारतासाठी चांगली बातमी म्हणजे की स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा चांगली फलंदाजी करत आहेत. दुसरीकडे कर्णधार हरमनप्रीतनेही लयीत परतण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय फिरकीपटूंनीही चांगली कामगिरी केली आहे. स्मृती मंधानाने सामन्यापूर्वी म्हटले की हरमनप्रीतने शेवटच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली आणि काही आक्रमक शॉट्स देखील खेळले जे संघासाठी खूप चांगली गोष्ट आहे. हा विजय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.

असा आहे भारत-इंग्लंड महिला संघ

भारतीय टीम: हरमनप्रीत कौर (कॅप्टन) स्मृति मंधाना, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव आणि सिमरन दिल बहादुर.

इंग्लंड टीम: हेदर नाइट (कॅप्टन), डॅनियल व्याट, टॅमी ब्यूमॉन्ट, नताली सायव्हर, अ‍ॅमी जोन्स (विकेटकीपर), सोफिया डन्कली, अन्या श्रबसोल, कॅथरीन ब्रंट, सोफी इक्लेस्टोन, सारा ग्लेन, मॅडी व्हिलियर्स, फ्रेया डेव्हिस, नताशा फरॅरंट आणि फ्रॅन विल्सन.