सुपरवुमन हरलीन देओलचा जबरदस्त कॅच (Photo Credit: Twitter)

IND VS ENG W 1st T20I 2021: इंग्लंड महिला (England Women) विरुद्ध भारत महिला  (India Women) संघातील पहिल्या टी-20 सामन्यात हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाला (Team India) पराभव पत्करावा लागला. पावसाने बाधित झालेल्या सामन्यात इंग्लंड संघाने डक वर्थ लुईस नियमानुसार 18 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाला (Indian Team) मालिकेच्या पहिल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले असले तरी हरलीन देओलने (Harleen Deol) आपल्या आश्चर्यकारक क्षेत्ररक्षणाने सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियावर हरलीनच्या या कॅचचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून लोक तिला 'सुपरवुमन' म्हणत आहे. हरलीनने पकडलेल्या या कॅचचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील स्वतःला तिचे कौतुक केल्यापासून वंचित ठेवू शकणार नाही. (ICC ODI Rankings: आयसीसी वनडे क्रमवारीत Mithali Raj ची गरुडझेप, अव्वल स्थानी झाली विराजमान)

इंग्लंडच्या डावातील 19 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर हरलीन देओल सीमारेषेवर क्षेत्ररसक्षण करत होती. इंग्लंडची अ‍ॅमी जोन्स फलंदाजी करीत होती, तिने शिखा पांडेच्या चेंडूवर फटका खेळला आणि चेंडू सीमारेषा पार पाठवण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवर जोन्सला पॅव्हेलियनमध्ये जावे लागेल असे कोणालाही वाटले नसेल, परंतु हरलीनने ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केले ते आश्चर्यकारक होते. झेल पकडण्यासाठी पहिले हरलीनने हवेत झेप घेतली. बाउंड्री लाईन अगदी जवळ असल्याने त्यामुळे हरलीनने चेंडू बाउंड्री लाईनच्या आत हवेत उडवला व आपला तोल सांभाळण्यासाठी सीमारेषे पार उडी मारली. यानंतर तिने बाउंड्रीच्या हवेत उडी मारत जबरदस्त कॅच पकडला. देओलचा हा झेल पाहून सर्वच चकित झाले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि सर्वत्र तिच्या झेलचे कौतुक होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचे तर ब्रिटिश संघाने पहिले फलंदाजी करून 20 ओव्हरमध्ये 7 गडी गमावून 177 धावांचे लक्ष्य दिले. ज्यानंतर पावसाने सामन्यात अडथळा आणा आणि DLS नियमांतर्गत टीम इंडियाला 8.4 ओव्हरमध्ये 73 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात भारतीय संघ 3 गडी गमावून 54 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि यजमान संघाने हा सामना 18 धावांनी जिंकला. दरम्यान, मालिकेचा दुसरा सामना आता 11 जुलै रोजी खेळला जाणार आहे. यजमान संघासाठी नताली सायव्हर शोची स्टार होती. तिने 27 चेंडूत 55 धावा फटकावल्या. तिच्या खेळीत आठ चौकार आणि एकाकी एका षटकाराचाही समावेश होता.