शेफाली वर्मा (Photo Credit: IANS)

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध सेंट लुसिया येथे झालेल्या मालिकेच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाची फलंदाज शेफाली वर्मा (Shafali Verma) हिने ऐतिहासिक अर्धशतकाच्या नोंद केली आहे. शेफालीच्या 49 चेंडूंत 73 धावांच्या जोरावर भारतीय संघाने (Indian Team) 4 गडी गमावून 185 धावांचा मोठा स्कोर केला. अशाप्रकारे शेफाली आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या 15 वर्ष आणि 285 दिवसांत अर्धशतक ठोकणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे, तर टी-20 मध्ये सर्वात दुसरी तरुण महिला क्रिकेटपटू बनली आहे. सर्वात युवा वयात अर्धशतक करणारी यू.ए.ई.ची एगोडे ही पहिली महिला क्रिकेटपटू आहे. तिने 15 वर्ष 267 दिवसही अर्धशतकाची नोंद केली आहे. इतकेच नव्हे तर सर्वात टी -20 मध्ये अर्धशतक करत शेफालीने भारतीय संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) या लाही मागे सोडले आहे. रोहितने सप्टेंबर 2007 मध्ये टी-20 क्रिकेटचे पहिले अर्धशतक झळकावले होते. यावेळी रोहित 20 वर्षांचा होता. (IND vs WI Women ODI 2019: स्मृती मंधाना हिचा वेस्ट इंडिजमध्ये धमाका; सौरव गांगुली, विराट कोहली यांना मागे टाकत नोंदवला 'हा' रेकॉर्ड, जाणून घ्या)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याच्या प्रकरणात शेफालीने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा 30 वर्ष जुना विक्रमही मोडीस काढला आहे. शेफालीने 15 वर्षात 585 दिवसात पहिले अर्धशतक झळकावले तर सचिनने 16 वर्षात 214 दिवसांत पहिले अर्धशतक ठोकले होते. आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या शेफालीनेही स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्याबरोबर विक्रमी 143 धावांची भागीदारीही केली. क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात दोन भारतीय फलंदाजांनी केलेली सर्वात मोठी भागीदारी आहेत. यापूर्वी तिरुष कामिनी आणि पूनम राऊत यांच्यात 130 धावांची भागीदारी झाली होती.

या मॅचमध्ये शेफाली बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 13 चेंडूत 21 आणि वेडा कृष्णमूर्ती हिने 7 चेंडूत 15 धावा करत वेगाने धावा केल्या. यामुळे वेस्ट इंडिजच्या महिला संघाला आव्हानात्मक धावसंख्या मिळाली. शेफालीने 49 चेंडूत 6 चौकार आणि चार षटकार ठोकले तर मंधानाने 46 चेंडूत 11 चौकार ठोकले. वेस्ट इंडिजकडून शकीरा सेल्मन आणि कर्णधार अनीशा मोहम्मद यांना दोन विकेट घेण्यात यश मिळाले.